Goa Aap Protest At NH 66 Dainik Gomantak
गोवा

Goa AAP: भर पावसात दरड कोसळलेल्या ठिकाणी ‘आप’ची सरकारविरोधी घोषणाबाजी

National Highway 66: जनतेबद्दल थोडी तरी आस्था असेल तर सरकारने कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

निकृष्ट बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांना पाठीशी घालून सरकार लोकांच्या जीवाशी खेळत असून जनतेबद्दल थोडी तरी आस्था असेल, तर सरकारने अशा कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी ‘आप’ने पेडणे तालुक्याच्या वतीने मालपे येथे राष्ट्रीय महामार्ग ६६ वर दरड कोसळलेल्या ठिकाणी महामार्गावर भर पावसात धरणे धरून व घोषणा देऊन सरकारचा निषेध नोंदविला.

यावेळी देवेंद्र प्रभुदेसाई म्हणाले की, पत्रादेवी ते महाखाजन पर्यंतचा महामार्ग हा दर्जाहीन आहे. महामार्गानजीकची दरड कोसळत असल्याने या मार्गाने प्रवास करणे धोकादायक झाले आहे. भाजपला हा कंत्राटदार निधी पुरवत असल्याने त्याला पाहिजे ते करण्यास या सरकारने रान मोकळे करून दिलेले आहे. म्हणून सरकार या कंत्राटदाराच्या या दर्जाहिन कामाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे.

पेडणे व मांद्रेचे आमदार या प्रश्नावर गप्प आहेत.पुंडलिक धारगळकर म्हणाले की , ‘एमव्हीआर’ कंपनीच्या बांधकामाबद्दलच्या ज्ञानाचा संशय येऊ लागला आहे.यावेळी वाल्मिकी नायक, सुनील सिग्नापूरकर, यांनी एमव्हीआर कंपनीच्या दर्जाहिन कामावर सरकार मौन बाळगते, असे सांगून सरकारवर जोरदार हल्ला चढविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

Budh Gochar 2026: हस्त नक्षत्रात बुधाचे महागोचर! 5 राशींच्या जातकांची तिजोरी पैशांनी ओसंडून वाहणार; व्यवसायात येणार मोठी तेजी

Education System Crisis: सत्य निकेतनची इमारतच नाही, तर शिक्षण व्यवस्थाही ढासळतेय! विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेपासून शिक्षणाच्या बजेटपर्यंत गंभीर प्रश्न

Karapur Mega Project: 161 दिवसांनंतर कारापूरवासीयांचे आंदोलन अखेर मागे! 'वन गोवा' प्रकल्पाला काम बंद करण्याची पंचायतीची नोटीस; न्यायालयीन लढा मात्र सुरूच

Goa Forward AAP Alliance: 'गोवा फर्स्ट' आघाडीची तयारी अंतिम टप्प्यात! विजय सरदेसाईंना सर्वाधिकार; 'आप'सह समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT