Goa Health Insurance Dainik Gomantak
गोवा

Goa Health Insurance: "प्रत्येक गोमंतकीय कुटुंबाला 10 लाखांचा हेल्थ इन्शुरन्स द्या", 'आप'ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, चर्चेसाठी मागितला वेळ

AAP Goa Health Insurance Demand: ‘आप’ची ही मागणी राजकारणासाठी नसून प्रत्येक गोमंतकीयाला दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: ‘आप’चे गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहून कोणत्याही अटींशिवाय प्रत्येक गोमंतकीय कुटुंबाला १० लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण देण्याच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी वेळ मागितला आहे. पत्रकार परिषदेत नाईक यांनीच ही माहिती दिली.

  • ते म्हणाले की, ‘आप’ची ही मागणी राजकारणासाठी नसून प्रत्येक गोमंतकीयाला दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी आहे. गोवा सरकारने आरोग्य व्यवस्था सुधारण्याची खरी इच्छा दाखवली, तर पंजाबमध्ये आप सरकारने यशस्वीपणे राबविलेल्या १० लाख रुपयांच्या आरोग्य विमा योजनेचा अनुभव आम्ही राजकारण बाजूला ठेवून सरकारसोबत शेअर करण्यास तयार आहोत.

पंजाबच्या आरोग्य मॉडेलची तुलना करताना वाल्मिकी नाईक म्हणाले की, गोव्यातील डीडीएसएसवाय योजनेत केवळ ४४७ उपचारांचा समावेश आहे, तर पंजाबमध्ये २,३५० उपचारांना विमा संरक्षण दिले जाते. पंजाबमधील आप सरकार कोणत्याही अटींशिवाय प्रत्येक कुटुंबाला १० लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण देते, ज्यामुळे श्रीमंत, गरीब आणि मध्यमवर्गीय सर्वांनाच समान दर्जाची आरोग्यसेवा मिळते. असा दावा त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT