AamAadmiParty  Dainik Gomantak
गोवा

Goa AAP: आम आदमी पार्टीची गोवा कार्यकारिणी बरखास्त; अमित पालेकर प्रदेशाध्यक्षपदी कायम

लवकरच नवीन जबाबदाऱ्या जाहीर होणार

Akshay Nirmale

Goa AAP Dissolves: आम आदमी पक्षाने त्यांची गोवा कार्यकारिणी शनिवारी तत्काळ प्रभावाने बरखास्त केली. राज्यात पक्षाला अनेक धक्के बसल्यामुळे गोवा युनिट विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे आपने म्हटले आहे.

गोव्यातील आपचे सर्व प्रमुख पदाधिकारी दिल्लीला गेले आहेत. आप पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत त्यांची बैठक झाल्याचे समजते.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यासाठीच हा निर्णय झाल्याचे समजते. 2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत 'आप'ला केवळ एक जागा जिंकता आली होती.

नवीन संघटनात्मक रचनेची घोषणा लवकरच केली जाईल, असे आपने म्हटले आहे. तथापि,, प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर आपल्या पदावर कायम राहणार आहेत.

आम आदमी पक्षाच्या वतीने गोवा संघटना विसर्जित केल्यानंतर पक्ष सर्व जबाबदाऱ्या नव्या पदाधिकाऱ्यांकडे सोपवू शकतो. काही विद्यमान पदाधिकाऱ्यांना बदलले जाऊ शकते.

2022 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला केवळ एक जागा मिळाली होती. पक्षाच्या या कामगिरीबाबत वरिष्ठ वर्तुळात नाराजी होती.

दरम्यान, काही दिवसांपुर्वीच केजरीवाल यांना गोवा पोलिसांनी एका गुन्ह्यात उपस्थित राहण्याबाबत नोटीस पाठवली होती. नंतर केजरीवाल त्या विरोधात कोर्टात गेल्यावर पोलिसांनी तीनोटीस मागे घेतली होती.

पुढील वर्षी लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभुमीवर आपने आत्तापासून तयारीला सुरवात केली आहे. त्यासाठी गोव्यात नवी संघटनात्मक बांधणी करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT