AAP Press conference | Surel Tilve and Rahul Mhambare | Goa AAP News Updates | Congress BJP News  Dainik Gomantak
गोवा

काँग्रेस ही भाजपची ‘बी टीम’

कॉंग्रेसचे-भाजपचे संबंध नवरा-बायकोप्रमाणे असल्याची ‘आप’ची टीका

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात नुकतेच झालेले भाजप-कॉंग्रेसचे राजकीय नाट्य, हा काँग्रेस भाजपची ‘बी-टीम’ असल्याचा आणखी एक पुरावा असल्याचा दावा आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष ॲड. सुरेल तिळवे यांनी मंगळवारी केला. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Congress MLA Girish Chodankar) यांनी काँग्रेसच्या आमदारांना भाजपमध्ये येण्यासाठी 40 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा केला होता. असे असताना कॉंग्रेस पक्ष भाजपवर कारवाई करण्याऐवजी मूग गिळून गप्प का, असा सवाल तिळवे यांनी उपस्थित केला. (Goa AAP News Marathi)

पक्षांतर हे कॉंग्रेसच्या ‘डीएनए’मध्येच आहे. कॉंग्रेसचे आणि भाजपचे संबंध नवरा-बायकोप्रमाणे असल्याचे ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) नेहमीच सांगतात. पक्षांतराचे नाटक थांबले असले तरी येत्या काही दिवसांनंतर ते पुन्हा सुरू होईल, असे ते यावेळी म्हणाले.

सरकारला घेरण्याची संधी गमावली

विधानसभा अधिवेशन ही भाजप सरकारवर एक होऊन टीका करण्यासाठी संधी होती. मात्र, सर्वांत मोठा विरोधी पक्ष आपल्याच अजेंड्यामध्ये व्यस्त असल्यामुळे ही संधी गमावल्याचे नाईक म्हणाले. काँग्रेस नेते कामत यांनी या षडयंत्रात ते सामील होते की नाही हे स्पष्ट करावे, असे संदेश तेलेकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US Israel War: इरणा नवा 'गेमचेंजर' आक्रमक! मोजतबा खामेनेईंनी दिली अमेरिकेला खुली धमकी; जगाची 'लाईफलाईन' रोखणार?

Iran US Israel War: 12 दिवसांचा भीषण बॉम्बवर्षाव, तरीही इराणची सत्ता अभेद्य! अमेरिकन गुप्तचर अहवालानं उडवली ट्रम्प- नेत्यान्याहूची झोप

Bhausaheb Bandodkar: लोकांना विलीनीकरण नको होते, पण 'भाऊ' हवे होते! जनमत कौलानंतरही टिकून राहिले भाऊसाहेब बांदोडकरांचे वलय

Train Viral Video: हद्द झाली..! वयाचं भान नसलेल्या 'त्या' व्यक्तीचा रेल्वेतील व्हिडिओ व्हायरल, तरुणीनं उडवली झोप; सोशल मीडियावर संतापाची लाट

आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 13 जणांचा मृत्यू, अजून 7 जण देतायेत मृत्यूशी झुंज; एकाच डेअरीतून दूध घेणाऱ्या 106 कुटुंबांना विषबाधा

SCROLL FOR NEXT