जनमन उत्सव सर्वेक्षणात प्रतिमा कुतिन्‍हो यांचा सहभाग Dainik Gomantak
गोवा

‘आप’च्‍या नेत्‍या प्रतिमा कुतिन्‍हो यांच्‍याकडून ‘जनमन उत्सव’ सर्वेक्षणाचे कौतुक

‘गोमन्‍तक’च्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे स्वागत करताना ही जबाबदारी एका वृत्तपत्राने उचलली आहे

दैनिक गोमन्तक

मडगाव: महिलांना स्वतःचे असे सक्षम व्यासपीठ तयार करून देण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नातील गोवा साकार करण्यासाठी ‘गोमन्‍तक’ने हाती घेतलेल्या ‘जनमन उत्सव’ सर्वेक्षणाला (Janman Utsav survey) शहरी तसेच ग्रामीण भागांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महिला स्वतःहून पुढे येऊन या उपक्रमात सहभागी होऊ लागल्या आहेत. आज गुरुवारी नावेली येथे झालेल्या सर्वेक्षणात आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि राज्य कार्यकरिणीच्या उपाध्यक्ष प्रतिमा कुतिन्‍हो या सहभागी झाल्या. ‘गोमन्‍तक’च्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे स्वागत करताना ही जबाबदारी एका वृत्तपत्राने उचलली आहे हे कौतुकास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.

या उपक्रमात ‘आप’च्या नावेलीतील युवा आघाडीच्या नेत्या सौम्या आदम यांनीही सहभाग घेतला. रातवाडो, नावेली, डोंगरी, रुमडामळ या भागांतील महिलांनी सर्वेक्षणात भाग घेतला. मुरगाव मतदारसंघात सडा परिसरातही हे सर्वेक्षण सुरू आहे. तेथे स्थानिक महिला वकील आश्विनी भोमकर यांनी सहभाग घेतला. तारीवाडा, श्री महादेव मंदिर, बीआरजी कॉलनी, सडा जेल परिसर, सडा जेटी परिसर येथे हे सर्वेक्षण करण्यात आले. दरम्‍यान, केपे मतदारसंघात किटला, फातर्पा, खोला तसेच काब-द-राम येथे हे सर्वेक्षण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT