Amit Palekar  Gomantak Digital Team
गोवा

Liquor Scam: राजकीय पाठिंब्याने गोव्यातून बनावट दारूची निर्यात : आपचा आरोप

अबकारी अधिकाऱ्यांच्‍या सहभागातून घोटाळा : ॲड. अमित पालेकर

दैनिक गोमन्तक

Goa Illegal Liquor Scam: राज्‍य सरकारच्या अबकारी खात्यात वरिष्ठांच्या सहकार्याने मोठे घोटाळे सुरू आहेत. त्‍याच अनुषंगाने आंतरराज्य बेकायदा दारू विक्री सुरू असून याला राजकीय पाठिंबा आहे, असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

गुरुवारी पक्षाच्या कार्यालयात राज्य समन्वयक ॲड. अमित पालेकर आणि उपाध्यक्ष संदेश तेलकर यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्यांवर बोट ठेवले.

ॲड. पालेकर म्हणाले, "सरकारच्या अबकारी खात्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. शेजारच्‍या राज्‍यांत पकडली जाणारी गोवानिर्मित दारू हे त्याचे उदाहरण आहे. बाहेरील राज्यातून आयात केला जाणारे स्पिरिट आणि तयार होणारी अल्कोहोल दारू यामध्‍ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे."

"ही तफावतच बेकायदा आणि बनावट दारूच्या निर्मितीचे केंद्र आहे. अशी बनावट दारू राज्यात आणि राज्यात बाहेर विकली जात असून यामध्ये अबकारी खात्यातील वरिष्ठ अधिकारी गुंतले आहेत," असा आरोपही ॲड. पालेकर यांनी केला.

काय म्‍हणाले पालेकर?

  1. राज्यातील कुंडई, काणकोण, कुंकळ्ळी, सांकवाळ या औद्योगिक वसाहतींमध्ये मद्य निर्मितीचे कारखाने आहेत. त्या कारखान्यांसाठी मोठ्या प्रमाणात स्पिरिट आयात केले जाते ते ‘बल्क’ लीटरमध्ये असते.

  2. संबंधित कारखान्यांमधून तयार होणाऱ्या दारूची विक्री बेकायदेशीररीत्या शेजारील राज्यांमध्ये केली जाते. तसे पुरावे मिळाले आहेत.

    काणकोणमधील १२-१४ मद्यालयांतून दारू दुकानदार मोठ्या प्रमाणात एकाच प्रकारची दारू खरेदी करतात. मात्र, राज्यांतर्गत तिचा वापर केला जात नाही तर ती कर्नाटकात विकली जाते.

  3. अलीकडच्‍या काळात कर्नाटक सरकारने यावर निर्बंध आणले असले तरीही ही अवैध दारू विक्री सुरूच आहे. शिवाय नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक परिणाम करणारी आहे, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT