AAP Leader Atishi Atishi - X Handle
गोवा

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

AAP Leader Atishi: आतिषी यांनी भाजपवर हल्लाबोल करताना, भाजप सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला.

Pramod Yadav

पणजी: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिषी यांची गोव्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आम आदमी पक्षाच्या वतीने शुक्रवारी (२५ जुलै) आतिषी यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत. पंकज गुप्ता यांच्या आजारपणामुळे आतिषी यांच्या तात्काळ प्रभावाने नियुक्ती करण्यात आली आहे.

गोव्याचे प्रभारी पंकज गुप्ता गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने आतिषी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे.

आतिषी यांनी भाजपवर हल्लाबोल करताना, भाजप सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. भाजप केंद्रीय यंत्रणांचा राजकारणासाठी गैरवापर करत आहे. या यंत्रणांच्या मदतीने छापेमारी करुन देखील भ्रष्टाचाराची एकही घटना न सापडल्याने भाजप आता आपच्या नेत्यांविरोधात खोट्या केसेस तयार करत आहेत. आपने भाजपच्या छुप्या अजेंड्यांचा पर्दाफाश केल्याचे आतिषी म्हणाल्या.

केजरीवाल यांच्यानंतर दिल्लीचे अल्प कालावधीसाठी मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या आतिषी सध्या दिल्ली विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्या आहेत. भाजपने ईडीच्या मदतीने आप नेत्यांना त्रास देण्यास सुरुवात केल्याचा आरोप त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने देखील भाजप ईडी, सीबीआई यासारख्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा ठपका ठेवल्याचेही आतिषी म्हणाल्या.

गुजरातमधील विसावादार पोट निवडणुकीत आपच्या उमेदवाराचा पराभव करण्यात भाजपला अपयश आल्याने आता ईडीच्या मदतीने आप नेत्यांच्या केसेस पुन्हा सुरु केल्या जात आहेत. भाजपने या पोट निवडणुकीत बक्कळ पैसा खर्च केला. शिवाय ड्राय राज्यात पोलिसांच्या मदतीने दारु देखील वितरीत केली. आपच्या कार्यकर्त्यांना धमकी दिली तसेच, उमेदवाराला त्रास दिला तरी देखील आपचा उमेदवार बहुमताने विजयी झाला, असे आतिषी म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT