Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: दुचाकीवरून धोकादायक स्टंट करणाऱ्या तरूणाला अटक

वेर्णा पोलिसांनी केली कारवाई

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Police: दुचाकीवरून स्टंट करणाऱ्या एका तरूणाला गोव्यातील वेर्णा येथे पोलिसांनी अटक केली आहे. त्याने वाहतुकीच्या विविध नियमांचा भंग केला होता. त्यावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्तार रत्ती (वय 22) असे या संशयित तरूणाचे नाव आहे. तो बेतोडा, पोंडा येथील रहिवासी आहे.

गोव्यातील रस्त्यांवर रात्री-अपरात्री दुचाकीवरून स्टंट करण्याचा प्रयत्न काही तरूणांकडून होत असतो. हे व्हिडिओज सोशल मीडियात शेअरही केले जातात. या व्हिडिओंमध्ये दिसते की, स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने यात वाहन चालवले जात असते.

हा तरूण देखील अशाच पद्धतीने दुचाकीवर स्टंट करत होता. त्याच्या दुचाकीवर नंबरप्लेट नव्हती. त्याने हेलमेट परिधान केले नव्हते. त्याच्या बाईकला आरसे नव्हते. धोकादायक स्टंट करत तो स्वतःसह दुसऱ्या वाहनधारांच्या तसेच पादचाऱ्यांचा जीवाला धोका निर्माण करत होता. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोव्यात रस्ते अपघातांचे प्रमाण खूप आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अशा धोकादायक रायडर्सवर कारवाई केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT