Goa Accident News Dainik Gomantak
गोवा

Goa Accident News : रेडीघाटात कलंडला वाळू वाहतूक करणारा ट्रक; सुदैवाने बचावला चालक

पहाटे 5 च्या सुमारास घडला अपघात

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई - होंडा मार्गावरील रेडीघाट येथील नुहा पेट्रोल पंप जवळ आज पहाटे 5 च्या सुमारास रेती वाहु ट्रकाचा अपघात झाला. या अपघातात वाहन चालक बचावला आहे. तर वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एक ट्रक महाराष्ट्रातून वाळपईला रेतीची वाहतूक करीत होता. यावेळी पहाटे 5 च्या सुमारास ट्रक वाळपई - होंडा मार्गावरील रेडीघाट येथील नुहा पेट्रोल पंप जवळ आला असता ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहनाची झाडाला धडक बसली.

धडक एवढी जोरदार होती की ट्रक रस्त्याच्या बाजूला कलंडला. अपघातात सुदैवाने वाहन चालक बचावला आहे तर वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. वाळपई पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT