Curchorem truck Struck in Road  Dainik Gomantak
गोवा

Curchorem News: कुडचडेत सिमेंट ब्लॉक वाहून नेणारा ट्रक रस्त्यात रूतला

निकृष्ट काम केल्याचा स्थानिकांचा कंत्राटदारावर आरोप; वाहनधारक, पादचाऱ्यांना मनस्ताप

Akshay Nirmale

Curchorem News: कुडचडेत सिमेंटचे ब्लॉक वाहून नेणारा ट्रक रस्त्यात रूतल्याने पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. कुडचडे बाणसाय येथे हा प्रकार घडला आहे.

येथे ड्रेनेजच्या पाईपलाईचे काम सुरू आहे. त्यासाठी गटार खोदण्यात आले आहे. तेथेच हा या ट्रकचे चाक रूतून बसले. या ट्रकमधून सिमेंटच्या ब्लॉक विटा वाहून नेण्यात येत होत्या. तथापि, बराचकाळ हा ट्रक येथे रूतून बसला होता.

खूपदा प्रयत्न करूनही हा ट्रक खड्ड्यातून बाहेर काढण्यात यश आलेले नव्हते. दरम्यान, येथील कामगारांनीही ट्रक बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. बराचकाळ हा प्रकार सुरू होता. रस्त्यात हा ट्रक अडकल्याने येथून जाणाऱ्या येणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.

दरम्यान, ही कामे दर्जेदार होत नाहीत, कंत्राटदाराने कामे व्यवस्थित केलेली नाहीत, अशी तक्रार अनेकांनी केली.

गोव्याची राजधानी पणजीमध्ये स्मार्ट सिटी तसेच ड्रेनेज पाईपलाईनची कामे सुरू होती. या काळात येथेही सुमारे सहा ते सात वेळा ट्रक रूतल्याचे प्रकार समोर आले होते. त्यावरून सरकारवर आणि स्मार्ट सिटीच्या कामांवर टीकाही झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT