Margao
Margao  Dainik Gomantak
गोवा

Margao News : भररस्‍त्‍यावर कोसळला वृक्ष; सुदैवानेच प्राणहानी टळली! तब्‍बल चार तास वाहतूक ठप्‍प

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी, मडगावातील आबाद फारिया हा एक प्रमुख रस्ता. या रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते.

आज संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास एक मोठा वृक्ष या रस्‍त्‍यावर उन्मळून पडला. त्यामुळे जवळजवळ चार तास वाहतूक बंद करण्यात आली. मात्र सुदैवाने आणि श्री दामबाबाच्या कृपेने प्राणहानी टळली.

काही दिवसांपूर्वी याच वृक्षांच्या मोठ्या फांद्या उन्मळून पडल्या होत्या. तरीही वृक्षमालकाने तो वृक्ष कापण्याची तसदी घेतली नाही, असे शेजाऱ्यांनी सांगितले.

पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन वृक्ष हटविण्याचे काम केले. माहिती मिळताच आम्ही लगेच घटनास्थळी पोहोचलो आणि झाड कापून रस्‍ता वाहतुकीसाठी रस्‍ता मोकळा केला, असे अग्निशमन दलाचे प्रमुख गीर सौदा यांनी सांगितले.

माता-पित्‍यासह मुलगा बचावला

सदर भलामोठा वृक्ष उन्मळून पडताना तेथून एक होंडा गाडी जात होती. या गाडीत एक दाम्‍पत्‍य व त्याचा लहान मुलगा मागे बसला होता. वाहनांची मागील काच फुटली, मात्र तिघेही थोडक्यात बचावले. हे एक वाहन सोडले तर तेव्हा रस्ता मोकळाच होता. वृक्ष खाली कोसळला तेव्हा समोरच्या घरातील वडीलधारी माणसे बाहेर होती. घराची कौले फुटली, पण त्यांना इजा झाली नाही. दामबाबानेच वाचवले, अशीच सर्वांची भावना होती.

या मुख्य रस्त्यावर आणखी अनेक धोकादायक झाडे आहेत, जी ताबडतोब कापणे आवश्यक आहे. मडगाव नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना याची दखल घेतली पाहिजे. तसेच आता जो वृक्ष कोसळला आहे, तो तेथून लगेच हटवावा.

- सगुण नायक, स्थानिक नगरसेवक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mining Transport: खनिज वाहतूकप्रश्‍नी सरकारला कानपिचक्या! कोर्टाने केल्या महत्वाच्या सूचना

Goa Muder Case: दारूची अर्धी बाटली ठरली तरुणाच्या खूनाचे कारण; मद्यधुंद मित्रानेच काढला काटा

Drummer William D'souza: प्रसिद्ध गोमंतकीय ड्रमर विलियम यांचे निधन; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Budget 2024: पीएम किसानच्या हप्त्यात होणार वाढ? कृषी तज्ञांनी अर्थमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Assagao Demolition: रमजानच्या दिवशी दोनापावल येथे शिजला घर पाडण्याचा कट, पूजा शर्माची अटक टाळण्यासाठी धडपड

SCROLL FOR NEXT