CM Sawant Attended 11th Shenoi Goembab Jayanti Utsav Dainik Gomantak
गोवा

Konkani language : संसदेत ‘कोकणी’साठी अनुवादक : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

डिचोलीत शणै गोंयबाब जयंती उत्सव उत्साहात

दैनिक गोमन्तक

कोकणीला उज्वल भविष्य असून, लवकरच दिल्लीतील संसदेत कोंकणी भाषेसाठी अनुवादकाची नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

कोकणीचे महापुरुष शणै गोंयबाब यांच्या 146व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी ‘जयंती उत्सव’ साजरा करण्यात आला. या उत्सवाचे उद्‍घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

शणै गोंयबाब हे कोकणीचे महापुरुष होते. सरकारने गोवा विद्यापीठात ''शणै गोंयबाब स्कूल ऑफ लँग्वेज अँड लिटरसी''ची स्थापना केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली. कोकणी भाषा जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा आजच्या पिढीने आदर्श घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

गोवा कोकणी अकादमी आणि डिचोली लायन्स क्लबच्या सहकार्याने डिचोली कोकणी सेवा केंद्रातर्फे येथील हिराबाई झांट्ये सभागृहात स्व. देवू पळ स्मृती व्यासपीठावर या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्यास ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो प्रमुख वक्ते या नात्याने तर सन्माननीय अतिथी म्हणून आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, नगराध्यक्ष कुंदन फळारी, खास आमंत्रित म्हणून साखळी कोकणी सेवा केंद्राचे अध्यक्ष राजन शेट्ये, सदाशिव वालावलीकर, लायन्स क्लबचे अध्यक्ष आझाद कडकडे आदी उपस्थित उपस्थित होते.

आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि प्रेमेंद्र शेट यांनी आपले विचार मांडले. उत्सवाचे स्वागताध्यक्ष प्रा. प्रकाश वझरीकर यांनी स्वागतपर भाषण केले. रुपेश ठाणेकर यांनी प्रास्ताविक केले. संजय सालेलकर आणि सागर च्यारी यांनी सूत्रसंचालन केले. कोंकणी अकादमीची सचिव मेघना शेटगावकर यांनी आभार मानले.

समारोप सोहळ्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कोकणी विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांचा या उत्सवात गौरव करण्यात आला.

दामोदर मावजो यांचा सत्कार

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक दामोदर (भाई) मावजो यांचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कोकणीसाठी योगदान दिलेल्या महेश कडकडे (डिचोली) आणि प्रा. रघुदास तारी (साखळी) यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

दामोदर मावजो यांनी यावेळी मार्गदर्शन करताना कोंकणीचा इतिहास आणि शणै गोंयबाब यांच्या योगदानावर प्रकाश टाकला.

रोजगार संवाद रंगला

उद्‍घाटन सोहळ्यानंतर कोकणी भाषा मंडळाची अध्यक्ष अन्वेषा सिंगबाळ यांच्या अध्यक्षतेखाली ''कोकणीत रोजगार आणि व्यवसायाच्या संधी'' या विषयावरील संवाद रंगला. डॉ. भूषण भावे यांनी सादरीकरण केले. तर टीजेएसबी बँकेचे व्यवस्थापक अरुण भट यांनी संवादात सहभाग घेतला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT