Baby Dainik Gomantak
गोवा

Goa News: बॉक्‍समध्‍ये सापडले दहा दिवसांचे अर्भक!

Goa News: मिरामार येथील घटना : ‘सीसीटीव्‍ही’मध्ये हार्ड डिस्कच नाही; पालकांना शोधणार कसे?

दैनिक गोमन्तक

Goa News: मिरामार येथे आज दुपारच्या सुमारास एका भिंतीच्या बाजूला असलेल्या कागदी खोक्यात दहा दिवसांचे बेवारस जिवंत अर्भक सापडले आहे. पणजी पोलिसांनी हे अर्भक गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी दाखल केले आहे.

त्या अर्भकाच्या पालकांचा शोध पोलिस घेत आहेत. मात्र, तेथील सीसी टीव्ही कॅमेऱ्यामध्ये हार्ड डिस्क नसल्याने शोधकार्यात अडथळे आले आहेत.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन हे अर्भक ताब्यात घेतले व लगेच 108 रुग्णवाहिकेने ते गोमेकॉ इस्पितळात पाठवले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत हे अर्भक दहा दिवसांचे असून ती मुलगी आहे. तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून प्रकृती ठीक आहे अशी माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली.

हे अर्भक 10 दिवसांचेच असल्याने महिलेने त्याला सरकारी किंवा खासगी इस्पितळात जन्म दिला आहे का याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. हे अर्भक बेवारसपणे सापडल्याने ते अनैतिक संबंधातून जन्माला आल्याने किंवा वारंवार मुलीला जन्म दिल्याने महिलेला तिच्या कुटुंबाकडून होणाऱ्या सतावणुकीला कंटाळून ते टाकण्यात आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते गोव्यातील आहे की गोव्याबाहेरून आलेल्या व्यक्तीने ते तेथे टाकले आहे याचाही शोध सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT