Fire In Goa Dainik Gomantak
गोवा

Fire In Goa: सुपरमार्केटच्या जनरेटरला अचानक लागली आग, म्हापसा- धुळेर येथे मोठी दुर्घटना टळली

वीज पुरवठा खंडित असल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

आज सकाळी म्हापसा- धुळेर येथील लँडमार्क बिल्डिंगच्या मागील बाजूस असलेल्या सुपरमार्केटच्या जनरेटरला आग लागल्याची घटना घडली. अग्निशामक दल वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय.

या दरम्यान तेथील वीज पुरवठा खंडित असल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. अग्निशामक दल वेळेवर न पोहोचल्यास लाखोंची हानी झाली असती.

या भागात रहिवासी राहत असून त्यांनी देखील आग विझवण्यात मदत केल्याचे त्यांनी सांगितले. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसून जनरेटर आणि इलेक्ट्रिक पॅनल असे मिळून सुमारे वीस हजारांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी वर्तवला आहे.

मागील दीड - दोन आठवड्यापासून गोव्यात आग लागण्याचे प्रमाण काहीसे कमी झाले होते. मात्र आज पुन्हा देवलामाळ- कुडचडे येथील जंगलाला देखील आग लागल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले असून त्यांचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हि आग कशी लागली, किती वाजता लागली या बाबत अद्याप माहिती उपलब्ध झाली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT