Francis Sardin  Dainik Gomantak
गोवा

Margao News: नेसायवासीयांवरील गुन्हे मागे घ्या: फ्रान्सिस सार्दिन

Margao News: या प्रकरणी ज्या 20 जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहेत, ते त्वरित मागे घ्यावेत, अशी मागणी आज पत्रकार परिषदेत त्यांनी केली.

दैनिक गोमन्तक

Margao News: सां जुझे द आरियाल (नेसाय) येथे पंचायत आणि अन्य अधिकारिणीच्या परवानगी शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणे अयोग्य असल्याचे मत खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी व्यक्त केले असून या प्रकरणी ज्या 20 जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहेत, ते त्वरित मागे घ्यावेत, अशी मागणी आज पत्रकार परिषदेत त्यांनी केली.

अशी मागणी स्थानिकांनीही केली असून या सर्व बाबीवर चर्चा करण्यासाठी उद्या गुरुवारी पाद्रीभाट येथे स्थानिक पंचायतीने ग्रामस्थांची सभा बोलावली आहे. सां जुझे द आरियाल येथील बेनाभाट येथे हा परवानगी शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. सध्या या पुतळ्याला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.

पुतळा उभारण्यापूर्वी सर्वांना विश्वासात घेणे आवश्यक होते. घडलेल्या प्रकारातून २० जणांविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे,

अशी मागणी सार्दिन यांनी केली आहे. पुतळा वादातून सध्या सां जुझे द आरियल येथील वातावरण अजूनही तणावपूर्ण असून या पार्श्‍वभूमीवर उद्या गुरुवारी सायंकाळी 5 वाजता पाद्रीभाट येथे पंचायतीने गावच्या लोकांची बैठक बोलावली आहे.

या बैठकीला गावच्या लोकांबरोबर या बैठकीला राज्यांतील इतर भागातील लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT