Bicholim Holi 2024  Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : डिचोलीत रंगांची उधळण; बाळगोपाळांसह महिलांनी लुटला होळीचा आनंद

Bicholim News : डिचोलीत वास्तव्य करुन असलेल्या कन्नडीगांनीही यंदा रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News :

डिचोली, एकमेकांवर गुलालाची उधळण करीत डिचोलीतील विविध भागात आज (सोमवारी) रंगपंचमी अर्थातच ''होळी उत्सव'' उत्साहात साजरा करण्यात आला.

लहान मुलांसह काही ठिकाणी महिलांही रंगपंचमीच्या उत्साहात सहभागी झाल्या होत्या. डिचोली शहरातील बाजार, नाईकनगर, सर्वण आदी विविध भागात आज सकाळपासूनच रंगोत्सवाची धूम सुरु होती. सर्वत्र गुलालाची उधळण सुरु होती.

लहान मुलांमध्ये तर भलताच उत्साह संचारला होता. सर्वत्र लहान मुले एकमेकांवर पाणीमिश्रित रंगांनी भरलेल्या पिचकाऱ्या मारून आणि बलून फोडून रंगपंचमी साजरी करताना दिसून येत होते. डिचोलीत वास्तव्य करुन असलेल्या कन्नडीगांनीही यंदा रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली.

डिचोलीतील वेगवेगळ्या भागात सध्या शिगम्याचा उत्साह संचारला आहे. बाळगोपाळ शिगम्याच्या आनंदात न्हावून गेले आहेत. रविवारी रात्री बहूतेक गावोगावी होळी पेटविल्यानंतर शिगमोत्सवाला प्रारंभ झाला आहे.

वाजतगाजत होळी आणल्यानंतर गावागावात पारंपरिक ठिकाणी विधिवत पूजन करुन होळी रोवण्यात आली शिगमोत्सवानिमित्त सर्वत्र ढोल-ताशांचा ''घुमचे कटर घुम'' घुमघुमू लागला आहे.

शबय, चोरोत्सवासह बहुतेक भागात उद्यापासून (मंगळवारी) रोमटांना सुरवात होणार आहे. पुढील काही दिवस शिगम्याचा उत्साह कायम दिसून येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morjim: 'परवाना एका नावाने, रेस्टॉरंट भलत्याच नावाने'! मोरजीतील धक्कादायक प्रकार; पंचायतीची कारणे दाखवा नोटीस

Serendipity Festival: 15 नाट्यप्रयोग, 17 मैफिली, कार्यशाळा! सेरेंडीपिटीचा गाजवाजा सुरू

Narakasur Goa : 'नरकासुर' प्रथा खरेच बंद होणार का?

Bhopal to Goa Flight : भोपाळकरांसाठी खुशखबर! सुट्टीसाठी बॅग भरा, 28 ऑक्टोबरपासून गोव्यासाठी थेट विमानसेवा सुरू

अग्रलेख: ड्रग्ज व्यवहाराची आश्रयस्थाने शोधली तरच गोवा ‘नशामुक्त’ होईल..

SCROLL FOR NEXT