Goa University Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident News : चालकाचे नियंत्रण सुटले अन् लोखंडी सामाने भरलेली लॉरी उलटली

अपघातात चालकासह पाचजण जखमी

दैनिक गोमन्तक डिजिटल

दोनापावल येथील मणिपाल इस्पितळाजवळील वळणावर काल पहाटेच्या सुमारास मोठ्या ट्रकच्या चालकाचे नियंत्रण जाऊन उलटून झालेल्या अपघातात चालकासह पाचजण जखमी झाले. हा अपघात पहाटे 5च्या सुमारास घडला.

या ट्रकमधील दोघांना लोकांनी तर आतमध्ये अडकलेल्या एकाला अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. या जखमींना किरकोळ उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. रात्रीच्यावेळी हा अपघात घडल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लोखंडचे सामान असलेली मोठी ट्रक दोनापावल येथून बांबोळीच्या दिशेने जात होती. लॉरीमध्ये लोखंडी सामान होते. ही ट्रक मणिपाल इस्पितळाच्या रस्त्यावरील वळणावर पोहचली असता चालकाला या वळणाचा अंदाज आला नाही व त्याचे नियंत्रण सुटले. त्यामुळे लोखंडी सामाने भरलेली लॉरी उलटली.

अपघात घडताच चालकासह इतर चौघेजण आतमध्ये अडकले. त्यातील दोघांनी या लॉरीमधून बाहेर येण्यास यशस्वी झाले. या अपघाताच्या आवाजाने आजूबाजूचे लोक जागे झाले. इतर तिघेजण ट्रकमध्ये अडकून पडले होते. लोकांनी त्यातील दोघांना बाहेर काढण्यास यश मिळवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT