Siolim Accident Dainik Gomantak
गोवा

Truck Accident in Goa: ट्रकखाली आल्याने बालकाचा जागीच अंत; चालकाला अटक

शेळ-शिवोली येथील हृदयद्रावक घटना

दैनिक गोमन्तक डिजिटल

Truck Accident in Goa: शेळ-शिवोली येथे रस्ता हॉटमिक्सिंग सुरू असताना ट्रकचा धक्का बसल्याने कामगाराच्या सहा वर्षीय बालकाचा करुण अंत झाला.

सनदी विरेश लमाणी (रा. पर्वरी, मुळ रा. कर्नाटक) असे या चिमुकल्याचे नाव आहे. ही घटना आज सोमवारी सायंकाळी 4 च्या सुमारास घडली.

रस्ताकामासाठी ट्रकमधून रस्त्यावर टाकण्यासाठी खडीमिश्रित डांबर आणण्यात आले होते. घटना घडली तेव्हा ट्रकचालक रिव्हर्समध्ये ट्रक मागे घेत होता. यावेळी हा सनदी रस्त्याच्या बाजूला झोपलेला होता.

ट्रकच्या आवाजाने त्याला जाग आली आणि जागेवरून उठण्याच्या प्रयत्नात सनदीचे डोके ट्रकला आदळले. त्यामुळे त्याच्या कानाजवळ गंभीर दुखापत होऊन जागीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळी कामाला प्रारंभ अन्...

सोमवारी सकाळी शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांच्या हस्ते या हॉटमिक्सिंगच्या कामाला सुरवात झाली होती. त्यानंतर संध्याकाळी चारच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली.

ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथून जवळ भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे काम सुरू होते. तेथे काम करणाऱ्या कामगाराचे हे मूल होते. या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक सुदेश नारायण विर्नोडकर (50, रा. सडये-शिवोली) याला अटक करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT