Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: पर्यटक रशियन महिलेला मारहाण

मोरजीत दोन कामगारांना अटक

गोमन्तक डिजिटल टीम

सध्या देशी-विदेशी पर्यटकांना मारहाण करण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने पर्यटन क्षेत्र बदनाम होत आहे. त्यातच मोरजी येथील इन ग्रँड या हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या पर्यटक रशियन महिलेला दोन कामगारांनी मारहाण केल्याची तक्रार 24 रोजी पेडणे पोलिस स्थानकात नोंद केली.

महिलेच्या तक्रारीनुसार, या हॉटेलमधील कामगार अविनाश गोरिया (वय 29, रा. बदलापूर) आणि मोहम्मद फैजल खान (वय 26, रा. झारखंड) या दोघांवर पेडणे पोलिसांनी गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली.

पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरजी येथील इन ग्रँड हॉटेलमध्ये आयगल दावेल्तिनोवा ही 30 वर्षीय पर्यटक रशियन महिला वास्तव्य करून होती. 24 रोजी तीन वाजता ती राहात असलेल्या रूमच्या खिडकीतून दोन कामगारांनी प्रवेश करून तिचे नाक-तोंड दाबून तिला मारण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर तिने आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे पर्यटक जमले. त्यानंतर हे दोघेही संशयित पळून गेले. तक्रारदार महिलेने पेडणे पोलिस स्टेशनवर तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर भादंसं कलम 325 आणि 34 आयपीसी अंतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली.

या प्रकरणाचा पुढील तपास पेडणे पोलिस स्थानकाच्या महिला उपनिरीक्षक सुमेधा नाईक या पोलिस उपअधीक्षक राजेश कुमार आणि पोलिस निरीक्षक दत्ताराम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT