Railway Flyover Dainik Gomantak
गोवा

Shantinagar Flyover: शांतीनगर वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार; मंत्री गुदिन्हो यांनी केली घोषणा, म्हणाले..

पूल अरुंद अन् वाहनांची संख्या वाढल्याने काढली निविदा

दैनिक गोमन्तक

वास्को: नवेवाडे व महामार्गाला जोडणाऱ्या शांतीनगर येथील रेल्वे उड्डाण पुलाचे मजबूत व विस्तारीकरण करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे, जेणेकरून त्या पुलावर होणारी वाहनांची कोंडी दूर होण्यास मदत होईल, असे दाबोळीचे आमदार व पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले. या कामासाठी निविदा काढण्याचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण झाल्यावर बांधकाम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

(A railway flyover will be widening at Shantinagar)

शांतीनगर येथील रेल्वे उड्डाण पूल हा माजी मंत्री डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांच्या प्रयत्नामुळे झाला. त्यामुळे नवेवाडे व शांतीनगर जोडले गेले. या पुलावरून स्कूल बस इतर वाहने यांची सतत वर्दळ सुरू असते. हा पूल महामार्गाला जोडला गेल्याने अतिशय महत्त्वाचा आहे. मात्र, पूल अरुंद असल्याने व वाहनांची संख्या वाढल्याने त्या ठिकाणी वाहनांची कोंडी होण्याचे प्रकार सतत घडतात. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

नागरिकांची गैरसोय दूर व्हावी यासाठी तेथे नवीन व समांतर असा पूल बांधण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. त्यादृष्टीने मंत्री गुदिन्हो यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, दक्षिण पश्चिम रेल्वे प्रशासनाने पुलाला मजबूत करून त्याचे विस्तारीकरण करण्याचे ठरविले आहे. या प्रस्तावाला गुदिन्हो यांनी मान्यता दिली आहे.

पुलाचे काम पूर्ण झाल्यावर त्या पुलावरुन दोन वाहने सहजपणे सुटतील. जेणेकरून तेथे होणारी वाहतुकीची कोंडी दूर होण्यास मदत होईल. हे काम सहा महिन्यांत पूर्ण होणार आहे. तोपर्यंत सदर पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे गुदिन्हो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT