Water Pipeline burst file Photo Dainik Gomantak
गोवा

Goa Pipeline Burst: पाणीटंचाईचं संकट असताना चरावणे सत्तरीत पाईपलाईन फुटली, हजारो लीटर पाणी वाया

या भागात आधीच कमी अनियमित पाणीपुरवठ्याची तक्रार होत असते

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Pipeline Burst: चरावणे सत्तरी भागात आधीच कमी आणि नियमित पाणीपुरवठ्याची तक्रार सतत होत असते. पाणीटंचाईचा मोठा त्रास या भागातील ग्रामस्थांना सहन करावा लागतो. त्यातच आता येथे पाणीपुरवठा करणारी एक पाईपलाईन फुटून हजारो लीटर पाणी वाया गेले आहे.

चरावणे भागात एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भासते. मात्र चरावणे गावात तीन चार ठिकाणी पाण्याची पाईपलाईन कित्येक दिवसापासुन फुटली असून त्यातून पाण्याची गळती होत आहे. गळतीच्या प्रमाणात अनेक ठिकाणी वाढ झाली आहे. त्यातून हजारो लीटर पाणी वाया जात आहे.

याबाबत ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. पण या तक्रारीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. एका बाजूने पाणी वाया जात आहे. तर दुसऱ्या बाजूला पाण्याविना नागरिकांचे हाल होत आहेत. काही भागात तर केवळ काही तासांसाठी एकदाच पाणी सोडले जाते.

त्यात आता ही पाईपलाईन फुटल्याने उंचावरील भागात पाणीच चढत नाही. त्यामुळे तातडीने या पाईपलाईनची दुरूस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT