Vijay Sardesai Dainik Gomantak
गोवा

'जयेश आम्हाला टाळत असल्यामुळेच त्याच्या विरोधात नोटीस': विजय सरदेसाई

आमच्याशी संपर्कच तोडला असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी स्पष्ट करत त्यासाठीच आम्ही त्याला कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे अशी माहिती दिली.

दैनिक गोमन्तक

मडगाव: वी दिल्लीला (Delhi) आमच्या बरोबर येण्यासाठी आम्ही जयेश साळगावकर (Jayesh Salgaonkar) यांना विमानाचे तिकीटही पाठविले होते मात्र आपले कुणीतरी वारले आहे असे सांगून त्यांनी दिल्लीला येण्याचे टाळले. त्यानंतर त्यांनी आमच्याशी संपर्कच तोडला असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी स्पष्ट करत त्यासाठीच आम्ही त्याला कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे अशी माहिती दिली. गोवा फॉरवर्डचे साळगावचे आमदार जयेश साळगावकर यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेऊन कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सरदेसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

ज्या दिवशी आम्ही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना भेटलो त्यावेळी जयेश आमच्या बरोबर नव्हता. त्या दिवशी पणजीचे आमदार बाबूश मोन्सरात यांनी राहुल गांधींना न भेटणारे आमदार भाजपात जाणार असे वक्तव्य केले होते. साळगावकर यांनी त्यावर कसलाही खुलासा केलेला नाही याचसाठी आम्ही त्यांना नोटीस पाठविली आहे असे सरदेसाई म्हणाले. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार जयेश भाजपचे महामंत्री सतीश धोंड यांच्या संपर्कात असून धोंड यांनीच बाबुशला ते वक्तव्य करण्यास सांगितले होते.

निवडणुकी नंतर आमच्यापैकी कुणी पक्षांतर करू नये यासाठी आम्ही देव बोडगेश्वरासमोर भविष्यात कुठल्याही प्रकारे भाजप बरोबर संबंध ठेवणार नाही अशी शपथ घेतली होती. पण जयेशने निवडणूकीपूर्वीच भाजपशी घरोबा करून आपण देवालाही भीत नाही असे दाखवून दिले आहे. जयेश सारख्या देवावर श्रद्धा असलेल्या आमदाराला फोडण्यासाठी भाजपने बाबुश सारख्या पक्षफोडीत माहीर असलेल्या आमदारांची मदत घेतली असे म्हणावे लागेल असे सरदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT