Goa Leopard Rescued  Dainik Gomantak
गोवा

Goa Leopard: शिरसोडे येथे भरवस्तीतील विहरीत पडला बिबट्या

वन विभागाच्या अनेक प्रयत्नांनंतर अखेर बाहेर काढण्यात यश

Akshay Nirmale

Goa Leopard Rescued from well: उत्तर गोव्यातील शिरसोडे येथे एक पुर्ण वाढ झालेला बिबट्या विहरीत पडला. वाळपई येथील वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी महत्प्रयासानंतर बिबट्याला बाहेर काढले. त्याला सुरक्षित अधिवासात सोडले जाणार आहे.

म्हादई अभयारण्य क्षेत्राजवळ शिरसोडे हे गाव आहे. या गावात पहाटेच्या सुमारास नर जातीचा बिबटा भक्ष्याच्या शोधात लोकवस्तीत आल्याचा अंदाज आहे. बिबट्या दयानंद गावकर यांच्या घराजवळील विहिरीत पडला. सकाळी दयानंद गावकर यांना ही बाब समजल्यावर त्यांनी वन खात्याला याची माहिती दिली.

म्हादई अभयारण्य क्षेत्रातील कर्मचारी तसेच अधिकारी गौरीश बैलुंडकर व वाळपई वनखात्याचे आरएफओ श्यामसुंदर गावस यांच्या मार्गदर्शनाखाली अथक परिश्रमानंतर बिबट्याला जिवंत बाहेर काढण्यात यश आले.

बिबट्या विहिरीत पडल्याने गावात एकच खळबळ उडाली होती. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीने परिश्रम घेऊन त्याला वर काढले. विहिरीत पाणी कमी असल्याने वाघाला काही झाले नाही. बिबट्याला जेरबंद केल्रयानंतर वाळपई येथे त्याची वैद्यकीय तपासणी केली गेली.

हा बिबटा सहीसलामत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. संध्याकाळी त्याला सुरक्षित स्थळी सोडण्यात येणार आहे.

म्हादई अभयारण्य क्षेत्रात बिबटा तसेच इतर वाघाचा वावर सातत्याने होत असतो. बिबट्या लोकवस्तीत येणे हे काही नवीन नाही. एप्रिल-मे महिन्यात जंगल भागात पाणी तसेच इतर भक्ष्याच्या शोधात वन्यप्राणी वस्तीत येत असतात.

त्यात काही दिवसापुर्वी म्हादई अभयारण्य क्षेत्रात आगीमुळे मोठ्या प्रमाणात वन्य जैवीक वनस्पती नष्ट झाली आहे. या कारणाने सुध्दा वन्य प्राणी जंगलातून लोकवस्तीकडे येऊ शकतात. बिबट्याला सुरक्षित बाहेर काढून त्याला जीवदान दिल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी बोलताना दयानंद गावकर म्हणाले की, शिरसोडे येथे पाण्यााची समस्या आहे. बिबट्यामुळे विहिरीतील पाणी दुषित झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT