Restaurant Dainik Gomantak
गोवा

हणजुणात रेस्टॉरंटला भीषण आग, पाच लाखांचे झाले नुकसान

बुधवारी मध्यरात्री आकस्मिक लागलेल्या भीषण आगीत एक मजली लाकडी रेस्टॉरंट (Restaurant) जळून खाक झाले.

दैनिक गोमन्तक

शिवोली: ग्रेंड -पिकेन ,हणजुण (Anjuna) येथील ब्र्लु -लाईन हॉस्पिटलीटी या घरगुती रेस्टॉरंटला बुधवारी मध्यरात्री आकस्मिक लागलेल्या भीषण आगीत एक मजली लाकडी रेस्टॉरंट (Restaurant) जळून खाक झाले. या आगीत  लाकडी फर्नीचर, वीजेवर चालणारी फ्रीज आदी उपकरणे  तसेच खाद्वापदार्थाचे  सामान मिळून अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती म्हापसा अग्निशमन दलाकडून मिळाली. दरम्यान, रात्री साडेबाराच्या सुमारास डीनर घेण्यासाठी एकत्रित बसलेल्या तेथील कर्मचाऱ्यांना रेस्टॉरंटच्या मध्यभागातून  आग लागल्याचे  लक्षात आले , यावेळी क्षणाचीही उसंत न घेता  कर्मचाऱ्यांनी जवळच्या नळाच्या पाण्याचा फंवारा मारुन आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु यावेळी तात्काळ आगीने रौद्ररुप धारण केल्याने शेवटी म्हापसा अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दलाचे पथक तात्काळ हणजुणात दाखल झाले व तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवीले. दरम्यान, ब्लु लाईन हॉस्पिटलीटी रेस्टॉरंटपासून शंभरेक मिटरच्या परिसरात कळंगुटातील एका बड्या राजकीय व्यक्तीचे रेस्टॉरंट असल्याने स्थांनिकांत मोठा गोंधळ उडाल्याचे यावेळी दिसून आले.. म्हापसा अग्निशमन दलाचे उप- अधिकारी अशोक परब यांच्या नेत्रुत्वाखाली फायरमन परेश मांद्रेकर, सुरज कारापुरकर, नीतीन मयेंकर, अक्षय सावंत , स्वपनेश कळंगुटकर, अर्जुन धावस्कर, प्रवीण पिसुर्लेकर तसेच ड्रायव्हर देवेंद्र नाईक यांनी भाग घेतला....

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT