पेडणे पोलिसांनी (Pedne police) आज केलेल्या कारवाईत मुंबईहून (Mumbai) गोव्यात (Goa) आलेल्या आठजणांची अमली पदार्थ तस्करांची टोळी ताब्यात Dainik Gomantak
गोवा

मुंबईहून गोव्यात आलेली अमली पदार्थ तस्करांची टोळी गजाआड

पेडणे पोलिसांची (Pedne police) कारवाई,अरोपींकडून सव्वा लाखांचे अमली पदार्थ जप्त, हरमल येथील स्वीट लेक परिसरातील डोंगर भागात अमली पदार्थांची विक्री करत होते.

दैनिक गोमन्तक

पेडणे: पेडणे पोलिसांनी (Pedne police) आज केलेल्या कारवाईत मुंबईहून (Mumbai) गोव्यात (Goa) आलेल्या आठजणांची अमली पदार्थ तस्करांची टोळी ताब्यात घेतली. संशयितांकडून 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले.

पेडणे पोलीस ठाण्याचे निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ तस्करांची एक टोळी मुंबईहून आली असून ती हरमल येथील स्वीट लेक परिसरातील डोंगर भागात अमली पदार्थांची विक्री करत असल्याची खबर त्यांना मिळाली. निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली काही पोलिसांनी बनावट ग्राहक बनून या टोळीशी संपर्क साधला. त्यांचा ठावठिकाणा लागताच जीवबा दळवी, उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी, हरीश वायंगणकर, हवालदार उदय गोसावी, कॉन्स्टेबल अर्जुन कळंगुटकर, स्वप्नील शिरोडकर, विनोद पेडणेकर, भास्कर चारी यांच्या पथकाने एका रिसॉर्टवर छापा टाकला. येथे हे आठ संशयित खोलीत वास्तव्य करून होते. सर्व संशयितांची कसून तपासणी केली असता त्यांच्याकडे विविध प्रकारचे ड्रग्स लपवून ठेवल्याचे आढळले. छाप्यादरम्यान पोलिसांना 800 ग्रॅम गांजा, 340 ग्रॅम चरस, 60 गांजाच्या बिया, एलएसडी आणि इतर कागदपत्रे मिळून आंतरराष्ट्रीय बाजारात 1 लाख 20 हजार रुपये मूल्य असलेले अमली पदार्थ जप्त केले. सर्व संशयितांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

ड्रग्सविक्रीसाठी मुंबईतून गोव्यात

अवघ्या १९ ते २५ वयोगटातील आठ युवक मुंबईहून गोव्यात पर्यटकांना अमली पदार्थांचा पुरवठा करण्यासाठी आले होते. संशयितांची नावे अशी - आलेक्स रोमियो (वय २५, रा. भांडुप, पश्चिम मुंबई), जेफ्री रॉड्रिग्स (वय २४, रा. सह्याद्री नगर भांडुप) सागर संजय जाधव (वय २१, रा.पांडे चाळ भांडुप), एड्रियन किंग्स्टन (वय २१, पटेल चाळ, सेंट अँथनी कॉलनी भांडुप), रोहितजी झेंडे (वय २०, टेंभीपाडा रोड, भांडुप), ऋषिकेश तुकाराम महाडिक (वय २१, टीपी रोड शिवाजी नगर भांडुप), वैभव किसन शिगवान ( वय २१ वर्षे, कांजुर मुंबई), रूपचंद लोंढे (वय १९, टेंभीपाडा रोड, भांडुप).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, भावनिक VIDEO शेअर करत म्हणाला, "मी माझ्या फलंदाजीमध्ये..."

Mapusa Traffic Police: म्हापशाच्या रस्त्यांवरील ट्रॅफिक जॅमला बसणार ब्रेक! 'वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवा!' उपसभापतींच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक

Goa Cyber Fraud Cases: गोव्यात सायबर फसवणुकीचे वाढते जाळे; ऑनलाईन व्यवहारांत नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा, पोलिसांचा सतर्कतेचा इशारा

Bharatiya Nyaya Sanhita Cases: सुमारे 78% प्रकरणांत आरोपपत्रे दाखल; 'बीएनएस' अंतर्गत गेल्‍या दोन वर्षांत 4,459 गुन्‍ह्यांची नोंद

Goa Cooperative Societies: राज्यातील 42% सहकारी सोसायट्या बंद, 42% सोसायट्या तोट्यात; सहकार क्षेत्राच्या आर्थिक सक्षमतेवर केंद्रीय सहकारमंत्र्यांकडून प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT