Cashew Plants Were Burnt In The Fire Dainik Gomantak
गोवा

Fire in Goa : कुळे, शिगाव परिसरात आगीचा प्रकोप

रानटी जनावरांची ससेहोलपट : धारबांदोड्यात चार दिवस धुमसतेय आग

दैनिक गोमन्तक डिजिटल

कुळे येथे आज दुपारी अचानक माळरानावर आगीने रौद्र रूप धारण केले. येथील मळाला आग लागल्याने रानटी जनावरांची जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू होती. जीवाच्या आकांताने ते सैरावैरा धावत होते.

कुळे-शिगावचे सरपंच गोविंद शिगावकर, पंच साईश नाईक, पंच अनिकेत देसाई यांनी इतरांसमवेत घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. परंतु भर दुपारी उन्हाच्या तडाख्यात आगीने उग्र रूप धारण केले.

आग आटोक्यात येत नाही, याची खात्री झाल्याने कुडचडे येथील अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोचले. त्यांनी पाण्याच्या फवाऱ्याने आगीवर नियंत्रण मिळवले.

सुरक्षा यंत्रणांचे प्रयत्न तोकडे

गेले चार दिवस गुरखे-धारबांदोडा येथील जंगलाला लागलेली आग धुमसतेय. संपूर्ण जंगल जळून खाक झाले; परंतु आग नियंत्रणात आलेली नाही. ग्रामस्थांनी आग विझवण्याचे पुष्कळ प्रयत्न केले; पण आटोक्यात आलेली नाही.

आगीमुळे डोंगर माथ्यावरील काजूच्या बागायती जळून खाक होण्याची शक्यता आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलासोबत वन खात्याने प्रयत्न करावेत, अशी मागणी श्रीकांत च्यारी यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT