Marago Fatorda Fire Incident Dainik Gomantak
गोवा

Marago Fire Incident: बंद फ्‍लॅटला आग लागून मडगावात २.५० लाखांचे नुकसान; शेजाऱ्यांमुळे मोठा अनर्थ टळला

Margao Fire News: बंद घरातील फ्रिज चालू ठेवणे पडले महाग; गॅसचा सिलिंडर जवानांनी बाहेर काढल्‍याने मोठा अनर्थ टळला

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News

मडगाव: फातोर्डा-मडगाव येथील सीमास अपार्टमेंटमध्ये असलेल्‍या एका बंद फ्‍लॅटला सोमवारी सकाळी आग लागून सुमारे २.५० लाखांचे नुकसान झाले. हा फ्‍लॅट गॅरी ग्रेसियस यांच्‍या मालकीचा आहे. फ्‍लॅटमध्‍ये ऑन ठेवलेल्‍या फ्रिजला आग लागून ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्‍यक्‍त करण्‍यात आला आहे.

सोमवारी सकाळी ११ वाजण्‍याच्‍या सुमारास या बंद फ्‍लॅटमधून धूर बाहेर येतो असे दिसून आल्‍यानंतर शेजाऱ्यांनी अग्निशमन दलाला बोलावून आणले. जवानांनी घराच्‍या बाहेरून आगीचा अंदाज घेतला असता किचनमध्‍ये ही आग लागल्‍याचे त्‍यांना कळून आले. त्‍यानंतर तातडीने हालचाली करीत किचनमध्‍ये असलेला गॅसचा सिलिंडर जवानांनी बाहेर काढल्‍याने मोठा अनर्थ टळला, अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी गील सौझा यांनी दिली.

मालक युकेला स्थायिक

या फ्‍लॅटचे मालक ग्रेसियस हे युकेमध्‍ये स्‍थायिक असून त्‍यांचा हा फ्‍लॅट बंद अवस्‍थेत होता. मात्र घरातील फ्रिज त्‍यांनी चालूच ठेवला होता. याच फ्रिजमधून शॉटसक्रीट होऊन ही आग लागण्‍याची शक्‍यता अग्निशमन दलाचे अधिकारी गील सौझा यांनी व्‍यक्‍त केली.

अडीच लाखांचे साहित्य नष्‍ट

या आगीत घरातील सुमारे दोन ते अडीच लाखांचे साहित्य नष्‍ट झाले असा अंदाज सौझा यांनी व्‍यक्‍त केला. वेळीच हा प्रकार शेजाऱ्यांच्‍या लक्षात आल्‍याने घरातील सिलिंडर बाहेर काढणे शक्‍य झाले. हा सिलिंडर पूर्ण भरलेल्‍या अवस्‍थेत होता. त्‍याच स्‍फोट झाला असता तर शेजारील फ्‍लॅटाचेही नुकसान झाले असते, असे त्‍यांनी सांगितले.

घरमालकांना आवाहन

कुणीही आपले घर बंद करून जास्‍त कालावधीसाठी बाहेर गावी जात असेल तर त्‍यांनी घरातील वीजयंत्रणा बाहेरून बंद करावी आणि घरात भरलेला किंवा रिकामी गॅस सिलिंडरही ठेऊ नये. ही दुर्घटना सकाळी घडली म्‍हणून फारसा अनर्थ घडला नाही. जर ही घटना रात्री घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता, असे अग्निशमन दलाचे अधिकारी गील सौझा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT