Goa Gram Panchayat Dainik Gomantak
गोवा

Goa Gram Panchayat: वादग्रस्त बांधकामांसंदर्भात गरमागरम चर्चा

पैंगीण ग्रामसभा : परवानगी देण्यापूर्वी खास ग्रामसभा बोलवा

दैनिक गोमन्तक

Goa Gram Panchayat: पैंगीणच्या ग्रामसभेत मागदाळ व वापे येथील वादग्रस्त बांधकामावर गरमागरम चर्चा झाली. यासंदर्भात गालजीबाग येथील सेबी व सादोळशे येथील ज्युडास बार्रेटो यांनी पंचायत मंडळाला कात्रीत धरण्याचा प्रयत्न केला. मात्र सरपंचासहीत पंचायत मंडळाने कायद्याच्या चौकटीत राहून परवाने दिले असल्याचे असल्याचे सांगितले.

मागदाळ येथे 120 कोलमची इमारत उभारण्यात येत आहे. त्या इमारतीत किमान ४० सदनिका असणार आहेत. त्या रेसिडेन्शियल इमारतीला नगर नियोजन मंडळ व अन्य सरकारी यंत्रणेने परवानगी दिली आहे. त्यामुळे गेल्या पंचायत मंडळाने या बांधकामाला परवानगी दिल्याचे या संदर्भातील सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर लक्षात आले असे सरपंच सविता तवडकर यांनी सांगितले.

पंचायतीने मागदाळ परिसरात फक्त सत्तर घरातून १५० मतदार आहेत आता या ४० सदनिकांमध्ये पाच रहिवाशांचा निवास राहिल्यास या भागातील लोकसंख्या चारशेच्या वर जाणार आहे. त्यामुळे येथील सामाजिक सलोखा बिघडण्याबरोबरच पेय जल, वीज समस्या निर्माण होणार आहेत याचा विचार पंचायत मंडळाने अंतिम परवाना देण्यावेळी करायला हवा होता, असे बार्रेटो यांनी सांगितले.

यावेळी उपसरपंच सुनील पैंगणकर यांनी प्रकल्पाच्या परवानगीची प्रक्रिया स्पष्ट करून पंचायत मंडळाची भूमिका शेवटची आहे. सर्व सोपस्कार पूर्ण केल्यानंतर संबंधित बांधकाम मालकाला परवाना दिल्याचे ग्राह्य धरण्याची मुभा असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रवीण भट यांनी यापुढे मेगा प्रकल्पांना परवानगी देण्यापूर्वी खास ग्रामसभा बोलाविण्याचा ठराव मांडला. यावेळी झालेल्या चर्चेत दीपक नाईक,डायगो डिसिल्वा यांनी भाग घेतला. या ग्रामसभेत जैवविविधता समितीच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT