Vasco Railway Dainik Gomantak
गोवा

Vasco Railway: रेल्वे विकास निगमच्या कामात अडथळा, मारहाण प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

रेल्वे विकास निगमच्या कामासाठी वापरलेल्या जेसीबी वाहनाचेही दगडफेक करून नुकसान केले

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को रेल्वे पोलिसांनी ओलेन्सियो सिमाॅईस, ऑर्विल दौरादो, फ्रान्सिस ब्रागांझा आणि कामिलो डिसोझा यांच्याविरुद्ध रेल्वेच्या कामासाठी वापरल्या जाणार्‍या जेसीबीचे नुकसान केल्याबद्दल आणि दगडफेक करून रेल्वे कामगारांना मारहाण केल्याबद्दल गुन्हा नोंदवला.

वास्को रेल्वेने भादंवि कलम 143, 147, 148, 324 आणि 427 नुसार 149 भादंविनुसार गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.

वास्को रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार रविवारी (19 रोजी) सामाजिक कार्यकर्ते ओलेन्सियो सिमाॅईस, ऑर्विल दौरादो, फ्रान्सिस ब्रागांझा, कामिलो डिसोझा (पंच सदस्य) आणि इतर 10 जणांनी बेकायदेशीर शस्त्राने कनई सरदार आणि रामेश्वर सरदार (दोघेही सूर्या कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे ​​कामगार) या मजुरांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला.

तसेच त्यांनी रेल्वे विकास निगमच्या कामासाठी वापरलेल्या जेसीबी वाहनाचेही दगडफेक करून नुकसान केले ज्यामुळे अंदाजे 45 हजारांचे नुकसान झाले. पुढील तपास पोलीस निरीक्षक अमरनाथ पासी यांच्या देखरेखीखाली वास्को रेल्वे पोलीस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT