Verna News Dainik Gomantak
गोवा

Verna News: सांकवाळ मधील 'त्या' घटनेसंबंधी चौघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकांच्या जीवावर खेळणा-या या टँकरवर तसेच मालकावर कडक कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी होती

गोमन्तक डिजिटल टीम

Verna News झुआरीनगर सांडपाणी- पाणी टँकर समस्या प्रकरणी वेर्णा पोलिसांनी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र अजून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. सांकवाळ येथील घटनेनंतर राज्यात टँकरद्वारा पाणी पुरवठा प्रकरण चांगलेच तापले आहे.

याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जलस्रोत विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी गोमंतकीयांना पिण्यासाठी टँकरचे पाणी न वापरण्याचे आवाहन केले.

यापूर्वीही असा प्रकार घडत होता. मात्र नागरिकांच्या तक्रारी असूनही कारवाई करण्यात आली नव्हती. त्यानुसार येथील जागृत नागरिकांनी पाळत ठेवून दोन आठवड्यापूर्वी रात्री सदर टँकरच्या घाणेरड्या कामाचा भांडाफोड केला.

पाण्याची वाहतूक करुन पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरमधून मलनिस्सारण घाणीची वाहतूक करून लोकांच्या जीवावर खेळणा-या या टँकरवर तसेच मालकावर कडक कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकांकडून करण्यात आली होती.

दरम्यान या प्रकरणी आरोपी व्यक्ती नजीर सय्यद, झरिंत, रा. झुआरीनगर,(क्र.जीए-06- टी-4683), पाण्याच्या टँकरचा मालक. हजरत पटेल बिरादार, बिर्ला, झुआरिनगर, सेप्टिक टँकरचे (क्र. जीए-04- टी-0967) मालक, जबी उल्ला वार, झुआरीनगर, गोवा, आणि जयराम बेकायदेशीरपणे सेप्टिक टँकर (क्र. जीए-04- टी-0967) मधील सांडपाणी पाण्याच्या टँकर (क्रमांक जीए-06- टी-4683) मध्ये टाकत असल्याचे निदर्शनास आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT