Goa Mining Dainik Gomantak
गोवा

Goa Mining : खाण उद्योगावर अवलंबून असलेल्यांना झटका; लिलाव प्रक्रियेला आव्हान

खाण खात्याकडून पहिल्या टप्प्यात चार खाण लिजांचा ई-लिलाव पूर्ण

गोमन्तक डिजिटल टीम

Mining in Goa: गेली काही वर्षे बंद असलेला खाण उद्योग सुरू होण्याचे संकेत मिळत असतानाच खाण लीजांच्या चालू असलेल्या लिलाव प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे खाण उद्योग सुरू होणार या अपेक्षेत असलेल्यांना झटका बसला आहे. 

सरकारच्या खाण खात्याकडून पहिल्या टप्प्यात चार खाण लिजांचा ई-लिलाव पूर्ण करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्यातील खाण लिजांचा ई-लिलाव करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

मात्र, आता मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर खाण लिजांच्या सुरु असलेल्या प्रक्रियेला आव्हान देण्यात आले आहे. तसेच त्यांना खंडपीठाने नोटिसा बजावल्या आहेत.

"पुढील पन्नास वर्षांचा विचार करुन राज्यात शाश्वत खाण व्यवसाय सुरु करणार आहे तसेच राज्यातील अन्य सर्व खाण ब्लॉकच्या लिलावाची प्रक्रिया पुढील 3 महिन्यांत पूर्ण करुन खाण व्यवसायाला चालना देण्यात येईल" अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. 

मात्र आता प्रक्रियेला न्यायालयात आव्हान दिल्याने खाण उद्योग सुरु होण्याच्या प्रक्रियेस ब्रेक लागणार की काय? अशी शंका निर्माण झाली आहे. या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी कधी होते? यावर खाण उद्योगांचे पुढील भवितव्य अवलंबून आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर एमएसपीएल लिमिटेड या कंपनीने ही याचिका सादर केली आहे. तसेच या याचिकेत यशस्वी बोलिदारांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.

'कस्तुरीरंगन' समितीच्या अहवालानुसार काही ट्रक मालकांनी एक दावा केला आहे. दक्षिण गोव्यात खाण उद्योग सुरु होण्याची शक्यता नसल्याचा दावा केला आहे.

खनिज माल वाहतुकीसाठी ग्रीन टॅक्स आणि जीपीएस हे परवडणार नसल्याचे कारण काही ट्रक चालक, मालकांनी समोर केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

SCROLL FOR NEXT