Accident Death Case Dainik Gomantak
गोवा

Accident Death Case: ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू! नामोशी येथील घटना

ट्रक चालकाला अटक

Kavya Powar

Accident Death Case: राज्यातील अपघातांच्या घटनेत दिवसेंदिवस कमालीची वाढ होत आहे. यातच आज (2 डिसेंबर) ट्रकच्या खाली आल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, विदेश पोळे (२३) हा GA-03AG-1081 या क्रमांकाच्या दुचाकीने पर्राहून ग्रीनपार्कच्या दिशेने निघाला होता. त्याच्याच समोरून GA-03V-0904 या क्रमांकाचा ट्रक निघाला होता. त्यावेळी हा अपघात घडला.

नामोशी येथील शाळेजवळील जंक्शनवर विदेशने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात त्याचा तोल गेला अन् तो दुचाकीसह ट्रकच्या चाकाखाली चिरडला गेला. आज सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी झालेल्या या अपघातात तो जागीच ठार झाला. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याप्रकरणी ट्रक चालकाला थिवी येथील रघुनाथ पवार (मूळ रा. कोल्हापूर) याला ताब्यात घेतले आहे. पोलीस संबंधित घटनेचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT