Mapusa banyan protest Gomantak Digital Team
गोवा

Mapusa banyan protest : वटवृक्ष पाडला; मानवी साखळी करून निषेध

फोरमचे प्रेमानंद दिवकर यांनी या प्रकाराची माहिती देऊन निषेध व्यक्त करणारी निवेदने संबंधित अधिकाऱ्यांना दिल्‍याचे सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa : खोब्रावाडा-कळंगुट येथे परस्पर पाडलेल्या 200 वर्षांपूर्वीच्या जुनाट वटवृक्षाचे येत्या पंधरा दिवसांत पुनर्रोपण करावे अशी मागणी करून स्‍थानिक व पर्यावरणप्रेमींनी आज सोमवारी मानवी साखळी तयार करून संबंधित बिल्डर व प्रशासनाचा निषेध नोंदविला. या वटवृक्षाच्या संवर्धनासाठी जागृती सभा कळंगुट मतदारसंघ फोरमतर्फे घेण्‍यात आली. या वृक्षाचे पंधरा दिवसांत पुनर्रोपण न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही यावेळी देण्‍यात आला.

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी हा प्रकार घडला आहे. ज्या जागेवर वृक्ष होता, तेथे दोन प्रकल्प येताहेत. त्यामुळेच तो वटवृक्ष पाडल्याचा आरोप स्थानिकांनी केला. या घटनेनंतर दोषींवर कारवाई झालेली नाही. त्‍यामुळे संताप व्‍यक्त करण्‍यात येत आहे. फोरमचे प्रेमानंद दिवकर यांनी या प्रकाराची माहिती देऊन निषेध व्यक्त करणारी निवेदने संबंधित अधिकाऱ्यांना दिल्‍याचे सांगितले.

एकत्र लढा देणे गरजेचे : प्रजल साखरदांडे

तनुज अडवलपालकर, वॉल्टर लोबो तसेच इतर वक्त्यांनी यावेळी घटनेचा निषेध व्यक्त करीत मनोगत व्यक्त केले. यात प्रा. प्रजल साखरदांडे, फोरमचे संयोजक प्रेमानंद दिवकर तसेच मान्यवर सहभागी झाले होते. सर्व लोकांनी एकत्रित येऊन हे बेकायदेशीर प्रकार थांबविण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन साखरदांडे यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT