Goa Accident News Dainik Gomantak
गोवा

Goa Fatal Accident: शिरदोन येथे दुचाकीला भरधाव कारची धडक, ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

Goa Accident: पोलिसांनी ३३ वर्षीय कार चालकाला अटक केली पण, नंतर त्याची जामीनावर सुटका करण्यात आली

Pramod Yadav

पणजी: भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत ६६ वर्षीय ज्येष्ठ नागिकाचा मृत्यू झाला आहे. शिरदोन जुन्या पुलावर रविवारी (०२ फेब्रुवारी) सकाळी सहा ते साडे सहाच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी आगशी पोलिसांनी ३३ वर्षीय कार चालकाला अटक केली नंतर त्याची जामीनावर सुटका करण्यात आली.

आलेक्स वेल्स (वय ६६, रा. आगशी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आगशी पोलिस स्थानकात या अपघाताची तक्रार नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आलेक्स गोवा वेल्हा येथून बांबोळीच्या दिशेने निघाले असता समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या चारचाकीने दुचाकीला जोराची धडक दिली. शिरदोन जुन्या पुलावर हा अपघात घडला. अपघातात आलेक्स गंभीर जखमी झाले. आलेक्स यांना उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले पण, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

याप्रकरणी पोलिसांनी संशयित ३३ वर्षीय कार चालकाला अटक केली पण, नंतर कार चालकाची जामीनावर सुटका करण्यात आली. दीपिका पारवार या प्रकरणाचा अधिक तपास करतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT