Anjuna Crime Dainik Gomantak
गोवा

Anjuna Crime : हणजूण येथे तरुणीचा विनयभंग करून मारहाण

संशयितांना अटक; ‘ती’ तरुणी गोवा सोडणार

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव येथे रेणुका बहादूर या महिलेवर गुंडांनी प्राणघातक केल्याची घटना ताजी असतानाच हणजूण येथे एका 25 वर्षीय तरुणीचा दोघांनी विनयभंग करून तिला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

नौमान उर्फ कवेश साबेरी (23, रा. हणजूण, मूळ छत्तीसगड) आणि राज उल्हास शिंदे (28, रा. ग्रॅण्ड पेडे, हणजूण) अशी संशयितांची नावे आहेत. 25 वर्षीय पीडित युवती सॉफ्टवेअर इंजिनियर असून दीड वर्षापासून ती गोव्यात वास्तव्यास आहे.

मंगळवारी पहाटे 4 च्या सुमारास ती फुड कोर्टवर जेवणाचे पार्सल आणण्यासाठी गेली होती. तिथे संशयितांनी विनयभंग केला. संशयितांना १४ दिवसांची पोलिस कोठडी बजावली आहे.

‘ती’ गोवा सोडणार

मंगळवारी माझ्यावर अतिप्रसंग ओढवल्याने भीती वाटू लागली आहे. सध्या हणजूणमध्ये चालणे-फिरणे माझ्यासाठी मुश्किल झाले आहे. त्यामुळे मी माझे घर बदलण्याचा निर्णय घेतलाय. वेळप्रसंगी गोवा सोडून जाण्याचा माझा विचार आहे, अशी कैफियत पीडित तरुणीने प्रसिद्धी माध्यमांसमोर मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 2.15, 2.28 की 2.57? 8व्या वेतन आयोगात बेसिक पे किती वाढणार, तुमचा पगार आणि एरियर कसा मोजला जाणार? पाहा संपूर्ण गणित

Goa Foundational Learning Survey: पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांचा आता 'लर्निंग सर्व्हे'; वाचन, लेखन अन् गणितातील पायाभूत कौशल्यांची कमतरता शोधणार

Rule Change: LPG सिलेंडर, FD, ATMपासून वाहनांच्या किमतीपर्यंत; 1 ऑक्टोबरपासून बदलले 6 मोठे नियम! तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Goa Tourism: दाबोळीवर उतरले 162 रशियन 'पाहुणे'; 2026-27 पर्यटन हंगामातील पहिले चार्टर दाखल, गोव्यात जंगी स्वागत

Gujarat ATS Drug Seizure: अरबी समुद्रात 3 हजार कोटींचे ड्रग्स जप्त! इराणच्या जहाजातून 526 किलो अमलीपदार्थ, पाकिस्तानचे 5 तस्कर ताब्यात

SCROLL FOR NEXT