Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa News : क्रिकेटचा खेळ जीवावर बेतला, छप्परावर अडकलेला चेंडू काढायला 15 वर्षीय मुलगा चढला अन्...

फाताेर्डा पोलिसांनी या घटनेची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे

सुशांत कुंकळयेकर

फातोर्डा येथील हाऊसिंग बोर्ड येथे क्रिकेटचा खेळ एका 15 वर्षीय मुलाच्या जीवावर बेतल्याची घटना घडली आहे. ही दुर्देवी घटना रविवारी सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. फाताेर्डा पोलिसांनी या घटनेची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, क्रिकेट खेळताना चेंडू छप्परावर पडला होता तो काढताना घसरुन पडल्याने एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज हाऊसिंग बोर्ड येथे घडली. ही घटना रविवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली.

हाऊसिंग बोर्ड येथे काही मुले क्रिकेट खेळत होती. यावेळी एकाने चेंडूचा मारलेला फटका समोर असलेल्या एका हायस्कुलच्या छप्परावर गेला आणि चेंडू तेथेच अडकून पडला. तो चेंडू काढण्यासाठी एक 15 वर्षीय मुलगा छप्परावर गेला. त्याने तो चेंडू काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र, छप्परावरील पत्रे फायबरचे असल्याने त्याचा पाय तेथे अडकला. त्याने सुटकेसाठी प्रयत्न केले. यावेळी त्याचा पाय घसरल्याने तो खाली पडला व गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी मुलाला दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात नेले असता तेथील डाॅक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. सोहेल शेख असे मृत मुलाचे नाव आहे.

फाताेर्डा पोलिसांनी या घटनेची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. पोलिस निरीक्षक दितेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक अमिन नाईक पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी कायदेशीर सोपास्कार करुन मृतदेह मृत मुलाच्या कुटुंबियाच्या स्वाधीन केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan Comeback: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT