गोवा

Goa: गोव्यात पर्यटकांच्या मोबाईलवर चोरट्यांचा डल्ला; 90 मोबाईल जप्त, 37 चोरट्यांना अटक

गेल्या वर्षीच्या तुलनेत चोरीच्या गुन्ह्यांची संख्या जवळपास निम्मी आहे, तर मोबाईल चोरट्यांकडून जप्त करण्याचे प्रमाण अधिक

Pramod Yadav

गोव्यात नववर्ष साजरे करण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या मोबाईलवर चोरट्यांचा डल्ला मारला. पोलिसांनी 37 चोरट्यांना अटक करत, 90 मोबाईल जप्त केले.

पोलीस अधीक्षक (उत्तर) निधीन वाल्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि राजस्थान-दिल्ली या राज्यातून तीन वेगवेगळ्या टोळ्या कार्यरत असल्याचे आढळून आले आले. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी गोव्यात आलेल्या पर्यटकांचे मोबाईल चोरी करत होते.

कळंगुट आणि हणजुणे पोलिसांनी एकूण 37 चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून दीड कोटी रुपयांचे 90 मोबाईल जप्त केले आहेत.

पोलिस उपअधीक्षक विश्वेश कर्पे आणि कळंगुटचे पोलिस निरीक्षक परेश नाईक यांनी चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी केलेल्या अतुलनीय प्रयत्नांबद्दल वाल्सन यांनी त्यांचे अभिनंदन केले.

मिळालेल्या गुप्तचर माहितीच्या आधारे चोरट्यांना अटक करण्यात आल्याचे वाल्सन यांनी सांगितले. तिन्ही टोळ्या स्वतंत्रपणे कार्यरत असल्याचे ते म्हणाले.

पर्यटकांना टार्गेट करून त्यांच्याकडून मोबाईल चोरण्याच्या विशिष्ट उद्देशाने टोळ्या राज्यात आल्या होत्या. त्यांच्याकडून काही महागड्या मोबाईलसह इतर प्रकारचे मोबाईल जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

नवीन वर्षात हणजुणे पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीच्या 90 तक्रारी आल्या होत्या, तर कळंगुट येथे 100 जणांनी त्यांच्या तक्रारी नोंदवल्या होत्या, असे वाल्सन म्हणाले.

गेल्या वर्षीच्या तुलनेत चोरीच्या गुन्ह्यांची संख्या जवळपास निम्मी आहे, तर मोबाईल चोरट्यांकडून जप्त करण्याचे प्रमाण अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT