MLA's disqualification  Dainik Gomantak
गोवा

MLA Disqualification Petition : याचिका आमदारच दाखल करू शकतो! 8 आमदारांचा अर्ज

आमदार अपात्रता याचिकेच्या निकालावर जनतेचे लक्ष

दैनिक गोमन्तक डिजिटल

MLA Disqualification Petition : आमदार अपात्रता याचिका सादर करणारी व्‍यक्‍ती ही आमदार असायला हवी. त्यामुळे याचिकादार डॉमनिक नोरोन्हा यांची संबंधित याचिका फेटाळावी, यासंदभार्तचा अर्ज भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 8 आमदारांनी खंडपीठात सोमवारी दाखल केला. या अर्जावर उत्तर देण्यासाठी नोरोन्हा यांनी वेळ घेतल्याने ही सुनावणी 29 मे रोजी होणार आहे.

अमित पाटकर यांनी जुलै 2022मध्ये आमदार दिगंबर कामत व आमदार मायकल लोबो या दोघांविरुद्ध आमदार अपात्रता याचिका त्यांच्या वर्तणुकीबाबत सादर केली आहे. या याचिकेतही कामत व लोबो यांनी सादर केलेल्या उत्तरात याचिकादार हे आमदार नाहीत, त्यामुळे ती फेटाळण्याची विनंती केली आहे.

पाटकर यांचे वकील अभिजीत गोसावी यांनी बाजू मांडली. ही सुनावणी कामत व लोबो यांचे ज्येष्‍ठ वकील नसल्याने ती जूनपर्यंत तहकूब करण्याची मागणी केली. यावेळी गोसावी यांनी आक्षेप घेऊन ही सुनावणी लवकरात लवकर घेण्याची विनंती सभापतींना केली. त्यामुळे ही सुनावणी आता येत्या 26 एप्रिलला ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सभापतींसमोर असलेल्या आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणी तीन महिन्यात घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी खंडपीठात याचिकेद्वारे विनंती केली होती. त्या याचिकेवरील सुनावणी गेल्या आठवड्‍यात पूर्ण होऊन त्यावरील निवाडा राखीव ठेवण्यात आला आहे.

जनतेचे लक्ष

आमदार अपात्रतेच्‍या मुद्यावर दोन याचिका दाखल झाल्‍या आहेत. त्‍यांचा काय निकाल लागतो, याकडे समस्‍त जनतेचे लक्ष लागले आहे. पक्षांतरबंदी कायदा असताना आठ आमदारांनी केलेले पक्षांतर वैध की अवैध? या मुद्याशी निगडित अनेक सुनावण्‍या झाल्‍या आहेत. यापूर्वी दहा आमदारांनी भाजपमध्‍ये केलेले पक्षांतर हे कायद्याच्‍या कक्षेत असल्‍याचा निकाल देण्‍यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: रक्ताच्या नात्यात रक्ताचा सडा! उसन्या पैशांच्या वादातून मेहुण्यानं मेहुण्याचाच काढला काटा; अलिगढमध्ये सुडाचं रक्तरंजित नाट्य

US Iran War: ''युरेनियम कोणालाही सोपवणार नाही'', इराण-अमेरिका संघर्ष विकोपाला; ट्रम्पच्या दाव्याला सुरुंग

PM Modi: पंतप्रधान मोदी देशाला करणार संबोधित! महिला आरक्षण विधेयक रद्द झाल्यानंतर घेणार मोठी भूमिका?

DA Hike: मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची वाढ; निवृत्तीवेतनधारकांनाही मिळणार मोठा लाभ

US Iran War: "आमच्या अटी मान्य करा तरच मार्ग खुला" इराणचा टायगर अवतार! व्हिडिओ शेअर करत अमेरिकेला दिलं खुलं आव्हान VIDEO

SCROLL FOR NEXT