Old Buses Running in Goa : पंधरा वर्षे पूर्ण झालेल्या ७७९ बसेस अजूनही राज्यातील मार्गांवर धावत असल्याचे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी विधानसभेतील लेखी प्रश्नाच्या उत्तरातून दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. आमदार क्रूज सिल्वा यांनी यासंदर्भातील प्रश्न विचारला होता.
पंधरा वर्षे पूर्ण झालेल्या किती बसेस अजूनही राज्यात सुरू आहेत? प्रदूषण पसरवत असलेल्या किती बसेसवर गतवर्षी कारवाई करण्यात आली? प्रवाशांची अतिरिक्त गर्दी केलेल्या किती बसेसवर कारवाई करण्यात आली? ‘माझी बस’ योजनेत किती बसेसचा समावेश आहे?
त्यांच्यावर आतापर्यंत किती खर्च करण्यात आला आहे? तसेच राज्यात किती इलेक्ट्रिक बसेस कार्यरत आहेत? आणि त्यांच्या कंत्राटदारांवर किती खर्च झालेला आहे? असे प्रश्न आमदार सिल्वा यांनी विचारले होते.
त्यावरील उत्तरात राज्यात पंधरा वर्षे पूर्ण झालेल्या ७७९ बसेस कार्यरत असल्याचे सांगत त्यांची यादीही मंत्री गुदिन्हो यांनी सादर केली. वायू प्रदूषण पसरवत असल्याप्रकरणी गतवर्षी वाहतूक खात्याने ६० बसेसच्या मालकांना चलन जारी केलेले आहे.
राज्यात सद्यस्थितीत एकूण किती इलेक्ट्रिक बसेस कार्यरत असून, त्यांच्या कंत्राटदारांवर सरकारने किती खर्च केले आहेत? असाही प्रश्न आमदार क्रूज सिल्वा यांनी विचारला होता. त्यावरील उत्तरात राज्यात सध्या १४१ इलेक्ट्रिक बसेस कार्यरत असून, त्यांच्या कंत्राटदारांवर आतापर्यंत सुमारे ७७.७७ कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत, असेही मंत्री गुदिन्हो यांनी उत्तरात म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.