Goa Dainik Gomantak
गोवा

Goa News : दिल्लीत ‘भारत पर्व’मध्ये गोव्याचा चित्ररथ प्रदर्शित; लालकिल्ल्यावर उद्‍घाटन

Goa News : ‘विकसित गोवा, विकसित भारत’ संकल्पनेवर आधारीत

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News : पणजी, प्रजासत्ताक दिनापूर्वी संरक्षण मंत्रालयातर्फे आयोजित सांस्कृतिक जल्लोषात बहुप्रतिक्षित ‘भारत पर्व’ला लाल किल्ल्यावर, नवी दिल्ली येथे प्रारंभ झाला.

पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांच्या भावनेचा म्हणजेच विविधतेतील एकतेचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि देशभक्तीचा उत्साह निर्माण करण्यासाठी आणि देशातील समृद्ध आणि विविध सांस्कृतिक विविधता प्रदर्शित करण्यासाठी आयोजित केलेल्या भारत पर्वचे उद्‍घाटन केले.

‘भारत पर्व’मध्ये ‘विकसित गोवा, विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित गोव्याचा चित्ररथ प्रदर्शित करण्यात आला आहे, ज्यामध्ये तपलोका योग क्षेत्र, गोव्याचे सागरी जीवन आणि जल जीवन मिशनचे चित्रण करण्यात आले आहे.

फोंडा येथील सुप्रसिद्ध कलाकार सुशांत खेडेकर यांनी गोव्यातील चित्ररथाची संकल्पना, सौंदर्यपूर्ण रचना तयार केली आहे जी ३१ जानेवारीपर्यंत ९ दिवसांच्या भारत पर्व दरम्यान प्रदर्शित केला जाईल.

गोवा राज्याव्यतिरिक्त इतर राज्ये म्हणजे आसाम, कर्नाटक, उत्तराखंड, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर यांनी लाल किल्ल्यासमोरील लॉन आणि ज्ञानपथ येथे आयोजित केलेल्या ‘भारत पर्व’मध्ये त्यांचा चित्ररथ प्रदर्शित केला.

सुशांत खेडेकरसह ४० कारागिरांचा चमू

राष्ट्रीय रंगशाळा शिबिरात, केंद्रीय विद्यालय क्रमांक २ जवळ आणि एपीएस कॉलनी, दिल्ली कँट १० येथे गोव्याच्या चित्ररथाच्या निर्मितीचे काम करण्यात आले.

कलाकार खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली सुतार, डिझायनर आणि फॅब्रिकेटर्ससह ४० कारागिरांच्या चमूने चित्ररथाच्या निर्मितीचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी चोवीस तास काम केले. माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्यावतीने गोवा चित्ररथ प्रदर्शित करण्यात आला आहे.

गोव्याचे पर्यटनविषयक दालन

या वर्षी गोवा चित्ररथाच्या प्रदर्शनाव्यतिरिक्त राज्याने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटनाशी संबंधित माहितीवर प्रकाश टाकणारा मंडप अर्थात दालन उभारले आहे आणि पर्यटन खात्यातंर्गत राष्ट्रीय स्तरावर गोव्याच्या पाककृतीला प्रोत्साहन देण्यासाठी खाद्य स्टॉल देखील उभारले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT