Goa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: हडफडे येथे 75 लाखांचे ड्रग्स जप्त; एकास अटक

Goa Drug Case: एएनसीची कारवाई : संशयित नायजेरियन नागरिक

दैनिक गोमन्तक

Goa Drug Case: हडफडे येथे ड्रग्सविरोधी कक्षाच्या (एएनसी) पथकाने छापा टाकून गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेला नायजेरियन ड्रग डिलर इनोसेंट ओकेझूयुनू आनेमेम (वय 56वर्षे) याला अटक केली. त्याच्याकडून कोकेन, एक्स्टसी पावडर व चरस मिळून सुमारे 75 लाखांचे ड्रग्स जप्त केले.

2013 साली पर्वरी महामार्ग अडविला तसेच बेकायदा वास्तव्य अशा प्रकऱणांत त्याला अटक झाली होती, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक नेर्लोन अल्बुकर्क यांनी दिली.

किनारपट्टी भागात एक नायजेरियन ड्रग्स व्यवसायात सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी या भागात रात्रीच्या वेळी पाळत ठेवली होती. शनिवारी रात्री दुचाकीवरून संशयास्पदरित्या फिरणाऱ्या नायजेरियन इनोसेंट ओकेझुयुनू याला हडफडे येथे ताब्यात घेण्यात आले.

झडती घेतली, तेव्हा त्याच्याकडे ४८९ ग्रॅम कोकेन, ज्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे ७२ लाख रुपये आहे. शिवाय १५ ग्रॅम एक्स्टसी पावडर आणि २५९ ग्रॅम चरस सापडला. या सर्व ड्रग्सची किंमत ७४.७५ लाख रुपये आहे. ही कारवाई अधीक्षक बॉस्युएट सिल्वा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तीन गुन्हे दाखल

संशयिताविरुद्ध यापूर्वी ३ गुन्हे दाखल आहेत. २०१३ मध्ये एका नायजेरियनचा खून झाला होता. त्यावेळी गोव्यातील नायजेरियन्सनी एकत्र येऊन पर्वरीतील राष्ट्रीय महामार्ग अडविला होता. तेव्हा काहीजणांना अटक झाली, त्यात त्याचा समावेश होता. गोव्यात बेकायदा वास्तव्य केल्याने त्याला म्हापसा येथील बंदिस्त केंद्रात ठेवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT