Belgaum to Goa Cycle Ride Dainik Gomantak
गोवा

75 सायकलस्वारांचा 'लिव्ह लाँग, लिव्ह स्ट्राँग'चा नारा! बेळगाव-गोवा रॅलीतून पर्यावरण जपण्याचा संदेश

Belgaum Goa Cycle Rally: युवकांसह ५० ते ७० वर्षे वयोगटातील सायकलस्वार या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यात १७ महिलांचाही सहभाग होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Belgaum Goa Cycle Ride

डिचोली,: ‘पर्यावरणासह आरोग्य सांभाळा’ असा संदेश देत बेळगावमधील ७५ सायकलस्वारांनी रविवारी ‘बेळगाव ते गोवा’ सायकल प्रवास केला. या सायकलस्वारांनी डिचोलीहून चोर्ला घाटमार्गे बेळगावची वाट धरली.

‘फिट इंडिया’ (FIT INDIA) संकल्पनेंतर्गत बेळगावच्या वेणूग्राम सायकलिंग क्लबच्या (Venugram Cycling Club) बॅनरखाली या रॅलीचे आयोजन केले होते. आज सकाळी हे सायकलस्वार विश्रांतीसाठी डिचोलीच्या बगलमार्गावर थांबले होते. त्यावेळी ‘गोमन्तक’च्या प्रतिनिधीने सायकलस्वारांची भेट घेऊन त्यांच्याशी सायकल प्रवासाविषयी संवाद साधला. गोव्यातील मनोहारी निसर्गसौंदर्य न्याहाळत या सायकलस्वारांनी शनिवारी सायंकाळी पेडणे तालुक्यातील मोरजी (Morjim) गाव गाठले. यावेळी त्यांनी मोरजी समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियानही राबविले.

२०१८ साली बेळगाव येथे ‘वेणूग्राम सायकलिंग क्लब’ची स्थापना करण्यात आल्यानंतर गेल्या सहा वर्षांपासून या क्लबतर्फे सायकल रॅली काढण्यात येते. दरवर्षी या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो, असे क्लबचे अध्यक्ष राजू नाईक यांनी सांगितले.

ज्येष्ठांसह महिलांचाही सहभाग

शनिवारी पहाटे बेळगाव येथून या सायकल रॅलीला प्रारंभ झाला. युवकांसह ५० ते ७० वर्षे वयोगटातील सायकलस्वार या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यात १७ महिलांचाही सहभाग होता. गोव्यातील समुद्रकिनारे, मंदिरे आणि निसर्गसौंदर्याने नटलेली पर्यटनस्थळे लक्षवेधी आहेत, असे सायकलस्वार म्हणाले.

लिव्ह लाँग, लिव्ह स्ट्रॉंग

आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाने व्यायामासाठी थोडा तरी वेळ द्यावा. सायकलिंग केल्याने शरीर तंदुरुस्त राहून, ताणतणाव दूर होण्यास मदत होते. युवा पिढीने सायकलिंग करून ‘लिव्ह लॉंग, लिव्ह स्ट्रॉंग’ रहावे. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असा संदेश राजू नाईक आणि रोहन आणि राजदीप यांनी यानिमित्ताने दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT