State Bank of India Dainik Gomantak
गोवा

Goa: केवायसीचे कारण पुढे करत बँकेतून 73 हजार रुपये केले लंपास

पुंडलिक वायंगणकर (Pundalik Waingankar) यांनी म्हापसा पोलिस स्थानकात तसेच बँकेच्या शाखा व्यवस्थापकांला सादर केली आहे.

दैनिक गोमन्तक

म्हापसा: क्रेडिट कार्डच्या क्रमांकाचा वापर करुन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) म्हापसा (Mhapsa) शाखेत असलेल्या आपल्या खात्यातून मुंबई-कुर्ला येथील रफुल शर्मा (Raful Sharma) याने 73,013 रुपये एवढी रक्कम काढल्याची तक्रार शिवोली येथील वासुदेव पुंडलिक वायंगणकर (Pundalik Waingankar) यांनी म्हापसा पोलिस स्थानकात तसेच बँकेच्या शाखा व्यवस्थापकांला सादर केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, 15 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास राहुल शर्मा यांनी कस्टमर केअर मधून मोबाइल वरून सीमकार्ड रीचार्च करायचे असल्याने वायंगणकर यांना कळवले व त्यासाठी केवळ दहा रुपये भरल्यानंतर अर्ध्या तासात रीचार्ज केले जाईल त्यांना सांगण्यात आले. त्‍यामुळे स्वत:विषयीची सर्व माहिती पुन्हा सादर करण्यास त्यांना कळवण्यात आले व त्यानुसार ‘केवायसी’ करण्यात येणार असल्याचेही त्यांना कळवण्यात आले. त्यासंदर्भातील सर्व सोपस्कार वायंगणकर यांनी पूर्ण केल्यानंतर सुमारे एका तासाने त्यांना स्टेट बँकेकडून फोन आला की त्यांच्या खात्यातून रक्कम 40,719 व 32,299 अशा दोन टप्प्यांत काढण्यात आली आहे.

मोबाइलचा वापर करून केवायसीच्या नावाखाली सर्व माहिती घेऊन हातोहात ती रक्कम गायब करण्यात आली आहे. दरम्यान, त्या व्यक्तीचे नाव राहुल शर्मा असले तरी त्याचे नाव व पत्ताही खोटा असू शकतो असा दावा यासंदर्भात बोलताना वासुदेव वायंगणकर यांनी केला आहे. परंतु, त्याने ती रक्कम लंपास केली ही सत्य घटना आहे, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' भाजपचेच प्यादे? चोडणकरांचा उपरोधिक टोला; 'आप'-भाजपमध्ये पंजाब-गोवा 'एक्सचेंज ऑफर' असल्याचा दावा

खरी कुजबुज: विकास नेमका कोणासाठी?

Swamala Campaign: 150 वर्षांचा आयुर्वेदिक वारसा अन् परेश रावल यांची साथ! 'स्वमाला'साठी धूतपापेश्वरची नवी मल्टिमीडिया मोहीम

Sanju Samson Record: 7 चौकार अन् 4 षटकार! 20 चेंडूंत वादळी अर्धशतक ठोकत संजूची हिटमॅनच्या क्लबमध्ये एन्ट्री; टीकाकारांचीही केली बोलती बंद

Goa Accident: बेदरकार मिनी बसचालकाने दुचाकीला उडवले! दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू; आके-पॉवरहाऊस मार्गावर भीषण अपघात

SCROLL FOR NEXT