Rice Farming Canva
गोवा

Goa Assembly Monsoon Session 2024: शेतकऱ्यांची चिंता वाढली! पावसामुळे गोव्यातील ७०% भातशेती धोक्यात

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी विभागीय कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांसह प्रत्येक गावाला भेट देणार आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

अविश्रांतपणे पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील ७० टक्के भातशेती कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी विभागीय कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांसह प्रत्येक गावाला भेट देणार आहेत. येत्या गणेश चतुर्थीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न राहील, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

हळदोण्याचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे शेतीच्या नुकसानीचा विषय उपस्थित केला होता. ते म्हणाले की, राज्यभरातील शेतांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. पाण्याचा निचरा न झाल्याने शेती कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. सरकार शेतकऱ्यांना दोन वर्षांनी नुकसान भरपाई देते, त्याचा त्यांना काहीच उपयोग होत नाही. भातशेतीची फेरलागवड करायची झाल्यास आताच भरपाई देणे आवश्यक आहे.

कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स म्हणाले की, आज-उद्या पावसाने विश्रांती घेतली नाही तर राज्यातील ७० टक्के भातशेती कुजणार आहे. फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी शेतकरी आधार निधी हा निधी झोपला असल्याची टीका केली. ते म्हणाले की, दहा हजार चौरस मीटर शेतीचे नुकसान झाले की, सरकार ४० हजार रुपये देते. ही रक्कम अत्यंत अल्प असून शेतीच्या मजुरीसाठीही पुरत नाही. आमदारांना बी-बियाणे, खते आणि भात कापणीसाठी यंत्रे पुरवावी लागतात. कृषी अधिकाऱ्यांना गावात पाठवा आणि शेतीच्या नुकसानीचा अंदाज घ्या. शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळेल, अशी व्यवस्था करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT