70 new corona patients have been registered in the last 24 hours in Goa
70 new corona patients have been registered in the last 24 hours in Goa 
गोवा

गोव्यात गेल्या चोवीस तासांत 70 नव्या कोरोना रूग्णांची नोंद

गोमन्तक वृत्तसेवा

पणजी : गोव्याला कोरोना नियंत्रणाच्या मोहिमेत काल पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. काल दिवसभरात एकाही कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीचे निधन झाले नाही. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार 6 रोजी 70 व्यक्ती कोरोना संसर्ग झालेल्या आढळल्या, तर 45 व्यक्ती कोरोना संसर्ग मुक्त झाल्या. कालच्या दिवशी कोरोनावर उपचार घेणाऱ्यांची संख्या 700 झाली असून कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती बरे होण्याची टक्केवारी 97.29 वर पोचली आहे. राज्यात 6 रोजी 60 वर्षावरील 1987 नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली, तर 45 वर्षावरील कालारी 267 व्यक्तींनी लस घेतली.

1 मार्चपासून 60 वर्षावरील व्यक्ती आणि 45 वर्षावरील कालारी व्यक्तींना कोविड प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. काल वरील दोन्ही गटातील एकूण 2254 व्यक्तींनी कोविड प्रतिबंधक लस घेतली. आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी यांनाही पहिला व दुसरा डोस देणे सुरू असून काल 240 जणांना पहिला डोस व 359 जणांना दुसरा डोस देण्यात आला. तसेच पोलिस, सुरक्षारक्षक व कोरोना नियंत्रणासाठी काम करणारे सरकारी अधिकारी यांना काल 94 जणांना पहिला डोस देण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: आमच्या वाटेला गेलात, तर खबरदार..!

Loksabha Election : समाजकार्यासाठीच धेंपे कुटुंब राजकारणात; उद्योगपती श्रीनिवास धेंपे

Valpoi News : होमगार्डनी पोलिसांप्रमाणेच लोकसेवेचा भार घ्यावा; पोलिस महासंचालक जसपाल सिंग

गोव्यातील रस्त्यावरील जाहिरातींचे फलक आणि डिजिटल स्क्रीन असलेली वाहने हटवा; HC

Cape News : केप्यात मोठ्या आघाडीची अपेक्षा : मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT