Old Goa Dainik Gaomantak
गोवा

Old Goa: गरम पाण्याच्या बाथटबमध्ये पडल्याने 7 वर्षीय दिव्यांग मुलीचा मृत्यू

79 टक्के भाजल्याने तिला अधिक उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेण्यात आले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

जुने गोवा येथील दिव्यांग मुलांसाठी केंद्रात दाखल असलेल्या सात वर्षांच्या दिव्यांग मुलीचा सोमवारी बाथटबमध्ये पडून मृत्यू झालाय. सदर घटनेसंबंधी पोलीसांकडून असे सांगण्यात आले की, जुने गोवा येथील सेंट झेवियर्स ट्रेनिंग कम प्रॉडक्शन सेंटर फॉर चिल्ड्रन विथ डिसॅबिलिटीज येथे रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास केंद्रातील दिव्यांग मुले अंघोळीसाठी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. (Old Goa)

या घटनेसंबंधीची चौकशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांमार्फत होणार असून जुने गोवा पोलीस या प्रकरणाच्या संदर्भात एफआयआर दाखल करण्याच्या प्रक्रियेत असल्याची माहिती जुने गोवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठांकडून देण्यात आली आहे.

तर या घटनेसंबंधी या केंद्राच्या व्यवस्थापनाने सांगितले की, येथील कर्मचारी पाणी आणण्यासाठी बाहेर गेले असताना ही दुर्दैवी घटना घडली. या मुलीला प्राथमिक उपचाराकरिता खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र ती 79 टक्के भाजल्याने तिला अधिक उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु असताना सोमवारी पहाटे 2 वाजता तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: गतवर्षीच्‍या तुलनेत पाऊस 28.43 इंचांनी कमीच, सरासरी पर्जन्यमानातील तूट अजूनही 30 टक्‍क्‍यांवर; हवामान विभागाचा निष्कर्ष

Amit Shah Goa visit: अमित शहा 6 सप्‍टेंबरला ठरविणार रणनीती; गोवा दौऱ्यामध्ये मंत्री, आमदारांसह गाभा समितीचीही घेणार बैठक

Horoscope: महादेवाच्या कृपेने दूर होणार संकटं! सोमवारपासून 'या' राशींना प्रत्येक क्षेत्रात यशाची शक्यता, रखडलेली कामं वेगाने पूर्ण होणार

Hampi History: हत्तींसाठी राजेशाही तबेले, घोड्यांसाठी हौद अन् भूमिगत कालवे; विजयनगरच्या वैभवाची अद्भुत कहाणी

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

SCROLL FOR NEXT