Yuri Alemao |Goa News
Yuri Alemao |Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa Winter Session: सात विरोधकांचा 'हम साथ साथ है'चा नारा; हिवाळी अधिवेशनापुर्वी बोलावली महत्त्वाची बैठक

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव : गोवा विधानसभेच्या आगामी अधिवेशनाबाबत रणनीती आखणे गरजेचे आहे. सध्या गोवा सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याच्या भ्याड प्रयत्नात आहे. यावर चर्चा करण्यासाठी सोमवारी, 26 डिसेंबर 2022 रोजी विरोधी आमदारांची बैठक आयोजित केली जाणार आहे. यात हम साथ साथ है, रहेंगे असे धोरण अवलंबले जाणार आहे. अशी माहिती विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दिली आहे.

(7 Opposition MLA's will meet to discuss strategy on upcoming Goa Legislative Assembly Session & attempts by coward )

मी विरोधी पक्षातील माझ्या सर्व सहा सहकार्‍यांशी वैयक्तिकरित्या बोललो आहे आणि सर्वांनी सोमवारी भेटून सरकारला धारेवर धरण्यासाठी रणनीती तयार करण्याचे मान्य केले आहे. आम्ही सात जण नक्कीच सरकारला कोंडीत पकडू, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, आपचे आमदार वेन्झी व्हिएगास आणि क्रूझ सिल्वा आणि आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर यांच्यासह काँग्रेसचे आमदार अॅड. कार्लोस आल्वारीस फरैरा आणि एल्टन डिकोस्ता या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती युरी आलेमाव यांनी दिली.

भाजप सरकार विरोधकांना घाबरते

युरी आलेमाव म्हणाले कि, भाजप सरकार विरोधकांना घाबरते हे स्पष्ट झाले आहे. विधानसभेच्या तारांकीत प्रश्नांतून मागील पाच वर्षांचीच माहिती घेता येणार अशा आशयाची सभापतींनी जारी केलेली अधिसूचना पाहून मला धक्का बसला, विरोधी आमदारांचा आवाज बंद करण्याची ताकद सरकारकडे नाही.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लक्षात घेतले पाहिजे की, 67 टक्के गोमंतकीयांनी गेल्या दहा वर्षातील भाजप सरकारच्या कारभाराविरूद्ध विधानसभा निवडणूकांत मतदान केले आहे. प्रत्यक्षात विरोधी पक्षाला गोव्यातील जनतेचा जनादेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

PM Modi In Goa : जल्लोषी माहोल अन्‌ मोदी करिष्म्याची जादू; गोव्यातील सभेला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT