Goa Government Schools Dainik Gomantak
गोवा

Goa Government Schools: धारबांदोड्यातील 7 शाळांची ‘घंटा’ होणार बंद! पटसंख्येचा अभाव

पालकांत चिंता, शाळा बंद न करण्याची मागणी

दैनिक गोमन्तक

Goa Government Schools: धारबांदोडा तालुक्यात सध्या ५० सरकारी प्राथमिक शाळा सुरू आहेत. त्यापैकी ७ शाळा विद्यार्थ्यांच्या पटसंख्येअभावी यंदाच्या वर्षी बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

धारबांदोडा तालुक्यातील जीर्ण झालेल्या सर्वच शाळा इमारतींचे लाखो रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले असले, तरी वेळीपवाडा, वाकीकुळण, माटोजे, सांतोण व कळसय या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने या शाळा बंद पडण्याच्या स्थितीत आहेत.

साकोर्डा येथील उधळशे व पानसवाडा या गावांतील शाळा सध्या एकही विद्यार्थी नसल्याने त्या बंद होणार हे नक्की आहे. बंद पडण्याच्या स्थितीत असलेल्या या शाळा वाचवायच्या असल्यास ग्रामस्थांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

गतवर्षी साकोर्डा पंचायत क्षेत्रातील मुर्गे व धारगे या शाळा विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने बंद करण्यात आल्या होत्या. सध्या या गावातील प्राथमिक विद्यार्थी बोळकर्णे व तांबडीसुर्ला येथील शाळेत जात आहेत.

मुर्गे व धारगे गावातून या विद्यार्थ्यांना जाताना ३ ते ४ किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो. सरकारने या विद्यार्थ्यांसाठी वाहतुकीची सोय करावी किंवा कोणत्या गावातील शाळांत विद्यार्थी संख्या जास्त आहे ते पाहून सरकारने बंद केलेल्या प्राथमिक शाळा चालू कराव्यात. - दिना गावकर, माजी सरपंच, साकोर्डा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT