Goa Murder Case Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case|दीड वर्षापूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला

हरिजन खून प्रकरण : दोघांना 7 दिवसांची पोलिस कोठडी

दैनिक गोमन्तक

वास्को: बायणा समुद्रकिनारी झालेल्‍या उमेश हरिजन (33) याच्‍या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले दोघे आरोपी अमीर हुसेन आणि दीपक सहानी यांना मंगळवारी वास्को पोलिसांनी न्‍यायालयासमोर उभे केले असता त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. वास्को पोलीस आणखी तीन आरोपींचा शोध घेत असून, त्‍यांना पकडण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू केले आहे. उमेश याने दीड वर्षांपूर्वी चार संशयितांपैकी एकाच्या भावाला मारहाण केली होती. तो राग मनात ठेवून ‘त्या’ चौघांनी सोमवारी दुपारी डाव साधला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

(7 days police custody for both in Harijan murder case)

शवचिकित्‍सा अहवालानुसार हत्‍यारांनी वार केल्‍याने फुफ्फुसाला जखमा होऊन मृत्‍यू झाला. याबाबत वास्को उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक राजेश कुमार यांनी माहिती दिली. काटेबायणा येथे सोमवारी भर दुपारी चौघांनी कोयता व चाकूने सपासप वार करून उमेश हरिजन (३०, रा. हाऊसिंग कॉलनी, बायणा) या तरुणाची निर्घृण हत्या केली. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला. चार संशयितांपैकी दोघांना फोंडा पोलिसांनी पाठलाग करून पकडले आणि मुरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. दीपक सहानी आणि अमिर अशी या संशयितांची नावे आहेत.

हिस्ट्री शीटर्स, रोडरोमिओ यांची तपासणी

दरम्यान, वास्को पोलिसांनी बायणा आणि मांगोरहील परिसरात आज गस्त कायम ठेवली आणि काल बायणा येथे झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर हिस्ट्री शीटर्स आणि रोडरोमीयो यांना तपासले. सर्वांना ताकीद देण्यात आली आहे.

असा रचला डाव

उमेश हा सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास बायणातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात आला होता. तेथे श्रींचे दर्शन घेऊन महापूजेचा महाप्रसाद घेऊन निघाला होता.

त्याच्यासोबत मित्र अशोक चलवादी होता. ते काटेबायणा येथील उड्डाणपुलाजवळ पोहोचले असता तेथे दबा धरून बसलेल्या चौघांनी त्यांना अडविले व उमेशला उड्डाण पुलाखाली नेले.

तेथे उमेशवर कोयता आणि चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात उमेश गंभीर जखमी झाला. हा प्रकार घडत असताना अशोकने उमेशच्या भावाला माहिती दिली.

भाऊ विजय तेथे कार घेऊन येईपर्यंत हल्लेखोरांनी घटनास्थळाहून पळ काढला. उमेशला उपचारासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT