Sanquelim Dainik Gomantak
गोवा

Sanquelim: वाळवंटीत 65 वर्षीय महिलेचा जीव देण्याचा प्रयत्न, नदीत उडी घेतली अन्...

सुदैवाने महिलेचा जीव बचावला असून, तिला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

Pramod Yadav

Sanquelim: वाळवंटी नदीत उडी घेऊन साखळीतील एका ज्येष्ठ महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने महिलेचा जीव बचावला असून, तिला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. बुधवारी सकाळी ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, साखळी येथील एका 65 वर्षांच्या महिलेने वाळवंटी नदीत उडी घेऊन जीव देण्याचा प्रयत्न केला. महिलेने नदीत उडी घेतल्यानंतर तिला नदीतील खडकाचा सहारा मिळाला. महिला खडकाची मदत घेऊन बराचवेळ तिथेच थांबली.

या घटनेची माहिती तात्काळ डिचोली अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जवानांनी महिलेला नदीतून सुखरूप बाहेर काढले.

जवानांनी महिलेला बाहेर काढले असून, तिला किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र, महिलेने टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप माहिती मिळू शकले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ENG vs IND: टीम इंडियाचे 'हे' 5 खेळाडू ठरले लाजिरवाण्या पराभवाचे कारण, कर्णधार अय्यरची एकाकी झुंज अपयशी; गोलंदाजांनी टेकले गुडघे

Goa Cricket Association: सलग पाचवा मोसम की नवा 'पाहुणा' खेळाडू? अर्जुन तेंडुलकरच्या गोव्यातील भवितव्याचा फैसला लवकरच!

मुरगाव, वास्कोत वीज बिलांचा शॉक! वाढीव बिलांमुळे संतप्त नागरिकांनी अभियंत्याला घेतलं फैलावर; विद्युत भवनात राडा

Goa Fraud Case: चार्ल्स शोभराजचा ‘चेला’ अखेर गजाआड! 35 वर्षांत 300 पंचतारांकित हॉटेल्‍सना गंडा; गोव्यातही राहून गेला महाठग

अरब व्यापाऱ्यांनी भारतात आणले आणि इथेच स्थिरावले, 'गोरखचिंचे'च्या प्रवासाची रंजक कहाणी

SCROLL FOR NEXT